गृहनिर्माण संस्थेच्या दिलीप कांबळेंना 75 हजाराची लाच घेताना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

खरेदी केलेल्या फ्लॅटवरील मुद्रांक व नोंदणी शुल्क शासनाने माफ केलेले असताना सुध्दा सोसायटी बरोबर अ‍ॅग्रीमेंट करावे लागते असे सांगुन उपनिबंधक आणि वकिलांना 75 हजार रूपये द्यावयाचे असल्याचे सांगत 75 हजार रूपयाची लाच स्विकारल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पुण्यातील कोंढवा परिसरातील संत सानेश्‍वर नगरमधील भगवान गौतम बुध्द गृहनिर्माण संस्थेचा सचिव दिलीप संतराम कांबळे (45) याला अटक केली आहे.
[amazon_link asins=’B00N78RZO6,B00GASLORE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e51dc04-b1db-11e8-b814-11adbdafbf1f’]

याप्रकरणी 36 वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली आहे. गृहनिर्माण संस्थेचा सचिव दिलीप संतराम कांबळे हे लाच मागत असल्याबाबत दि. 5 सप्टेंबर रोजी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. प्राप्‍त तक्रारीची खातरजमा करण्यात आली. तक्रारदाराने खरेदी केलेल्या फ्लॅटवरील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क शासनाने माफ केलेले हाते. तरी देखील आरोपी हा त्यांना सोसायटी बरोबर अ‍ॅग्रीमेंट करावे लागते व त्यासाठी उपनिबंधक आणि वकिलांना 75 हजार रूपये द्यायचे म्हणून त्यांच्याकडे लाच मागत होता. एसीबीच्या अधिकार्‍यांनी गुरूवारी सापळा रचला. 75 हजार रूपयाची लाच घेताना त्याला 40 हजार रूपयाच्या खर्‍या नोटा देण्यात आल्या.

राहिलेली डमी तयार करण्यात आली. आरोपी दिलीप कांबळेने सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून लाच स्विकारल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप दिवाण, अप्पर अधिक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चव्हाण आणि बोदादे आणि त्यांच्या पथकाने केली. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपाधिक्षक प्रतिभा शेंडगे करीत आहेत.

जाहिरात