Dilip Khedkar | IAS पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांना ‘या’ तारखेपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Dilip Khedkar | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (IAS Puja Khedkar) अडचणीत आलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडील पोलिसांच्या रडारवर आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये (Paud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या पार्श्वभूमीवर बाणेर (Baner) येथील मनोरमा खेडकर यांच्या निवासस्थानी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural) पिस्तूल रोखल्याप्रकरणी नोटीस देखील बजावली होती. त्यानंतर मनोरमा खेडकर यांच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ ते ६ पथके नेमली होती आणि त्यांच्या मार्फत शोध देखील सुरू होता. त्याच दरम्यान महाड (Mahad) येथील एका हॉटेलमधून मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी अधिक तपासासाठी २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणातील मनोरमा खेडकर यांचे पती दिलीप खेडकर हे देखील आरोपी आहेत. अद्यापपर्यंत त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्याच दरम्यान अॅड. सुधीर शहा यांनी दिलीप खेडकर यांच्या वतीने अटकपूर्व जामीनासाठी (Pre-Arrest Bail) अर्ज केला. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना न्यायालयाने काही अटी आणि शर्तींसह २५ जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश ए .एन मारे (District Judge A. N. Mare) यांनी हा जामीन मंजूर केला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा