दिलीप कुमार यांच्या दोन भावांना ‘कोरोना’ची लागण, लीलावती हॉस्पीटलमध्ये दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे दोन भाऊ एहसान खान आणि असलम खान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोघांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने शनिवारी रात्री उशीरा मुंबईतील लीलावती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. दोघांचे वय खुप जास्त आहे. एहसान यांचे वय सुमारे 90 वर्ष तर असलम त्यांच्यापेक्षा काही वर्षच छोटे आहेत. दोघांना कोरोनाशिवाय अगोदरपासून ब्लड प्रेशर आणि हृदयासंबधी आजार आहेत.

सूत्रांनी सांगितले की, एहसान खान आणि असलम खान यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याचे सांगितल्यानंतर डॉक्टर नितिन गोखले (हृदय रोगतज्ज्ञ) यांनी हॉस्पीटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला, कारण त्यांची ऑक्सीजन लेव्हल खुप कमी होती.

रिपोर्टनुसार, दोघांना डॉक्टर जलील पारकर यांच्या अंडर अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. जेव्हा डॉक्टर जलील पारकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, असलम खान आणि एहसान खान नॉन-इनव्हेसिव्ह व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. त्यांना हायपोक्सिया होता, त्यांचा ऑक्सीजन 94 पेक्षा कमी होता, दोघांना खोकला आणि ताप सुद्धा होता.

काही कालवधीपूर्वी 97 वर्षीय दिलीप कुमार यांनी ट्विटरवर लोकांना आपल्या घरात राहाण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून कोरोनाला रोखता यावे. त्यांनी ट्विट केले होते की, माझी तुम्हाला विनंती आहे की, या कोरोना संकटात आपल्या घरात राहा आणि जीव वाचवा. औषध सुद्धा आशीर्वाद सुद्धा, इतरांशी अंतर सुद्धा, गरीबांची सेवा, कमजोरांची सेवा सुद्धा.