Dilip Malkhede Passed Away | अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुण्यात निधन

0
1649
Dilip Malkhede Passed Away | Chancellor of Amravati University Dr. Dilip Malkhede passed away in Pune
file photo

पुणे : Dilip Malkhede Passed Away | संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे (Sant Gadgebaba Amravati University) कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे शनिवारी पहाटे पुण्यात निधन झाले. ते एक वर्षापासून कॅन्सरच्या (Cancer) आजाराशी लढा देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा आप्त परिवार आहे. (Dilip Malkhede Passed Away)

डॉ. दिलीप मालखेडे हे पुणे येथील शासकीय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक होते. त्यांची ११ सप्टेबर २०२१ मध्ये अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

डॉ. मालखेडे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेतून पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे (एम ई) शिक्षण घेतले. मुंबई आयआयटीमधून त्यांनी संशोधन कार्य करुन पी एच डी प्राप्त केली होती. डॉ. मालखेडे यांनी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार १ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम केले आहे.

कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन
ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठे यांच्यासोबत करार केला होता.
नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकता यावे याकरिता त्यांनी अमरावती विद्यापीठात सर्व विषयांसाठी
क्रेडिट बेस्ट चॉईस सिस्टीम सुद्धा लागू केली होती.

Web Title :- Dilip Malkhede Passed Away | Chancellor of Amravati University Dr. Dilip Malkhede passed away in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

U19 Womens World Cup | सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…

CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे