दिलीप वेंगसरकर म्हणतात ‘हा’ फलंदाज विश्वचषकात चौथ्या क्रमांकासाठी योग्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विश्वचषक २०१९ ची सर्वच संघानी जोरदार तयारी केली आहे. सर्वच संघ स्वतःला विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजत आहेत. भारतीय संघ देखील या सगळ्यात मागे नाही. मात्र भारतीय संघासाठी दोन गोष्टी मोठी चिंता वाढवणारी आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवचे जखमी असणे आणि चौथ्या क्रमांकावर भारताला अजूनही योग्य फलंदाज सापडलेला नाही. याच गोष्टींवर काल भारताचे माजी फलंदाज आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी आपले मत मांडले आहे.

वेंगसरकर म्हणाले कि, विश्वचषकासाठी निवडलेला संघ हा समतोलाचे आणि उत्तम कामगिरी देखील करेल. मात्र चौथ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूला संधी द्यायची, या प्रश्नावर ते म्हणाले कि सलामीला रोहित आणि शिखर अतिशय योग्य आहेत तसेच तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली आहेच. त्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुलला संधी द्यायला हवी. कारण इंग्लंडमध्ये खेळण्याचा राहुलला चांगलाच अनुभव आहे. हा अनुभव नक्कीच त्याच्या कामाला येईल.”आणि तो या क्रमांकावर उत्तम कामगिरी करेल,असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.भारतीय संघ या विश्वचषकात उत्तम कामगिरी करेल आणि जिंकेल असा विश्वास अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट रसिक व्यक्त करत आहेत .भारतीय संघातील सर्व जागांसाठी योग्य पर्याय आहेत मात्र चौथ्या क्रमांकासाठी अनेक पर्याय वापरून पाहिल्यानंतर देखील भारताला त्या जागेसाठी खेळाडू मेलात नसला तरी राहुलच्या रूपात तो शोध संपणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीला देखील संधी देऊ शकतो असे म्हटल्याने गौतम गंभीरने त्यांच्यावर टीका केली होती. चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे, असा सल्ला देखील त्याने त्यावेळी दिला होता.

Loading...
You might also like