दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेच्या ‘हंगामी’ अध्यक्षपदी ‘नियुक्ती’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्या जागी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्त करण्यात आली. सकाळपासून चर्चा होती की विधानसभेच्या अध्यक्ष पदी कोण? त्यानंतर अध्यक्ष पदासाठी दिलीप वळसे पाटलांची नियुक्ती होईल असे सांगण्यात येत होते परंतू आज त्यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

उद्या महाविकासआघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी महाविकासआघाडीची बहुमत चाचणी पार पडेल. यावेळी ठाकरे सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागेल.

याच कारणाने आमदारांच्या शपथविधीवेळी नियुक्त करण्यात आलेले भाजपचे नेते हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांना हटवण्याची तयारी सुरु झाली होती. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटलांना हंगामी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात येणार आहे.

कालपर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये धूसपूस दिसत होती. काँग्रेसकडून मागणी करण्यात येत होती की आम्हाला विधानसभा अध्यक्षपद हवे होते. परंतू त्यानंतर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदाचा दावा करण्यात आला होता.

अखेर हा पेच सुटताना दिसत आहे कारण, राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्ष पद देण्यात येईल असे वृत्त आहे. तर उपमुख्यमंत्रिपद काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना देण्यात येणार आहे. सध्या हंगामी विधानसभा अध्यक्ष पद भाजपचे कालिदास कोळंबकर यांना देण्यात आले होते. आता त्यांना हटवण्याची तयारी सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार हे स्पष्ट होत असले तरी विधानसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. परंतू या पदी दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत होते.

Visit : Policenama.com