Dilip Walse Patil | सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा, स्टिंग ऑपरेशनचा तपास CID कडे, गृहमंत्र्यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नेते (BJP Leader) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करत एक पेन ड्राईव्ह (Pen Drive) विधीमंडळात सादर केला. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आरोपांना उत्तर दिले आहे. या स्टिंग ऑपरेशनवर (Sting Operation) बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, तुमचा आरोप काहीही असला तरी मी कुणाची पाठराखण करणार नाही. मी तपासेल की, या मागे कोण आहे, दोषी कोण आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची ? हे आपण पाहणार असल्याचे दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले.

 

सरकारी वकिलांचा राजीनामा
दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) पुढे म्हणाले, फडणवीसांनी मागेही एक पेन ड्राईव्ह दिला होता,
दोन दिवसांपूर्वी पेन ड्राईव्ह दिला, आज पुन्हा एक पेन ड्राईव्ह दिला.
आपण एक डिटेक्टिव्ह एजन्सी (Detective Agency) तयार केली की काय ? असा सवाल वळसे पाटील यांनी केला.
तसेच प्रवीण चव्हाण (Praveen Chavan) यांनी आपल्या वकील पत्राचा राजीनामा (Resignation) दिला असून, सरकारने तो मान्य केला आहे.
तसेच या स्टिंग ऑपरेशन प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे (CID) सोपवण्यात येणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

 

खरं वास्तव समोर आलं पाहिजे
गिरीश महाजन यांच्याशी संबंधीत प्रकरणावरुन आपण जे आरोप केलेत.
त्याबद्दल बोलताना वळसे पाटील म्हणाले, आपला आरोप आहे की, महाजनांच्या विरोधात आम्ही षडयंत्र करतोय.
मात्र आपण सांगू इच्छितो की, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था (Jalgaon District Maratha Vidya Prasarak Sanstha) या संस्थेची 1917 रोजी स्थापना झाली.
यासंबंधीत भोईटे आणि पाटील गटातील वाद कोर्टात आहे. ही घटना झाल्यानंतर यामध्ये 29 आरोपींना अटक (Arrest) झाली.
या प्रकरणात मला एवढेच विचारायचे आहे की, पोलीस संरक्षण घेऊन यांना ही संस्था का चालवावी लागतेय.
या संस्थेवर कब्जा करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. जवळपास 300 दिवसांपेक्षा जास्त काळ संस्थेला बंदोबस्त दिला.
याबद्दलचं खरं वास्तव समोर आलं पाहिजे. म्हणून आपण त्यामध्ये कारवाईला सुरुवात केली.

घटना घडली पुण्यात, गुन्हा दाखल झाला निंभोऱ्यात
गिरीश महाजन प्रकरणातील घटना ही पुण्यात (Pune) घडली तर गुन्हा निंभोऱ्यात (Nimbhora) दाखल झाला.
यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. परंतु मी सांगू इच्छितो की, सुशांतसिंह प्रकरणात (Sushant Singh) घटना मुंबईत (Mumbai) झाली, त्याचा गुन्हा बिहारमध्ये (Bihar) दाखल झाला.
या घटनेचं आपण समर्थन करत नाही. फिर्यादीनुसार संस्थेच्या प्रकरणात आरोपी निलेश भोईटे (Nilesh Bhoite)
यांनी संस्थेची कागदपत्र देतो असे सांगून मारहाण, दमदाटी करुन ही संस्था आमच्या ताब्यात द्या असं सागितलं.
गिरीश भाऊ तुम्हाला 1 कोटी देतील असाही आरोप फिर्यादीने केल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

 

Web Title :- Dilip Walse Patil | BJP leader devendra fadnavis sting operation case will investigate by cid said home minister dilip walse patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा