
Dilip Walse Patil | शरद पवारांची साथ का सोडली?, रोहित पवारांचं नाव घेत दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान (व्हिडिओ)
मंचर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतर आमदारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करुन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी देखील अजित पवार यांची साथ दिली. तसेच मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा मंचर येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील चालू घडामोडींवर भाष्य केलं.
दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी अजित पवार यांची साथ दिल्यानंतर आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं? अशी पोस्ट ट्विटरवर केली होती. यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले, त्यांचं वय 37 वर्षे आहे. मला राजकारणात येऊन 40 वर्ष झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचं वय कमी आहे? त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट टाकली. माझी आणि रोहित पवारांची एकदा भेट झाली. तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून (Ambegaon Assembly) उभे रहा. त्यामुळे या व्यतिरिक्त माझं कोणतेही भांडण नाही. मी साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच डिंभे धरणाच्या (Dimbhe Dam) पाण्यावरुन निर्माण झालेल्या वादातून आपण हा निर्णय घेतल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंवर निशाणा
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जेव्हा शिवसेनेच्या आमदारांना (Shiv Sena MLA) घेऊन गेले. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मदत केल्याचा आरोप केला आहे. याला उत्तर देताना वळसे पाटील म्हणाले, सरकार पडल्यास माझेही मंत्रीपद जाणार होते. शिवसेनेतील नाराजीबाबत मी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांच्या कानावर वेळोवेळी घातले होते. तुमच्या पक्षात काहीतरी गडबड आहे ती दुरुस्त करा. असे सांगूनही काळजी करु नका मी बघतो असे उत्तर उद्धव ठाकरे देत होते. ठाकरे यांनी पक्षाची काळजी घेतली असती तर सरकार पडले नसते, असे म्हणत वळसे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मला कोणतीही नोटीस नाही
ईडीमुळे (ED) मी साहेबांची साथ सोडली नाही. मी जाहीर करतो. मला ईडी, सीबीआय (CBI),
इन्कम टॅक्सची (Income Tax) नोटीस आलेली नाही. कुठलंही वैयक्तिक हित यामागे नाही.
एका विद्वानाने सांगितलं की पराग (Parag) आणि गोवर्धन डेअरीला (Govardhan Dairy) नोटीस आली म्हणून हा निर्णय घेतला.
माझा आणि या डेअरीचा काडीचाही संबंध नाही. आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचा या डेअरीसोबत एक रुपयाचाही संबंध नाही,
असे स्पष्टीकरण वळसे पाटील यांनी यावेळी दिले.
शरद पवारांच्या सभेला सर्वांनी जावे
मी सत्तेसाठी हपापलेलो नाही. तालुक्यातील जे प्रश्न शिल्लक राहिले आहेत ते सगळे सोडवायचे आहेत.
आपली लढाई शरद पवार यांच्याबरोबर नाही. त्यांच्यावर रागही नाही. त्यांनी तालुक्याला भरभरून दिले आहे.
कारखाना, बंधारे, बँका हे सर्व करताना ते पवार यांच्यामुळे झाले माझ्यामुळे नाही हे मी नेहमी सांगतो.
शरद पवार यांची सभा असेल तर सर्वांनी जावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
Web Title : Dilip Walse Patil | dilip walse patil big statement on sharad pawar and rohit pawar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Maharashtra Politics News | ‘आता साहेब म्हणतोय… पण परत असं केलंत, तर…’, भाजप आमदाराचा अरविंद सावंतांना इशारा (व्हिडिओ)
- Chandrashekhar Bawankule | ‘ज्यांना तुम्ही बाजार बुणगे म्हणत आहात, कधीकाळी…’, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळेंचा पलटवार म्हणाले ‘आधी बुडाखाली…’
- Pune Karve Road News | कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार