Dilip Walse Patil | ‘देवेंद्र फडणवीसांना आरोपी म्हणून नाहीतर…. ‘; गृहमंत्र्यांनीच सांगितलं नोटीस पाठवण्याचं खरं कारण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेत, राज्यातील पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या घोटाळ्याबाबतची (Maharashtra Police Officer Transfer Scam) माहिती केंद्रीय गृहसचिवांना (Union Home Secretary) दिली होती. पोलिसांनी (Mumbai Cyber Police) मला नोटीस पाठवली असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री (Maharashtra Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले आणि उत्तरही मी पाहिले नाहीत. मात्र राज्य गुप्तवार्ता विभागातील State Intelligence Department (SID) डेटा बाहेर कसा गेला याची चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांनी जो पेन ड्राईव्ह केंद्रीय सचिवांना दिला आहे तो आम्हाला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पोलिसांनी सचिवांना पत्र (Letter) लिहित केली आहे. फडणवीस यांना आरोपी म्हणून नाही तर माहिती घेण्यासाठी त्यांना नोटीस (Notice) पाठवली होती. त्यांना कोणत्याही कटात अडकवण्याचा किंवा फसवण्याचा सरकारचा संंबंध नाही, असं दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितलं.

मी विधानसभेचा सदस्य म्हणून 37 वर्षे आहे, सभागृहाच्या (Assembly) प्रथा, परंपरा आणि प्रिव्हलेज याबाबतची मला माहीत आहे. तपास अधिकाऱ्यांना (Inquiry Officer) कोणाचाही जबाब घेण्याचा अधिकार आहे. त्यांना आधीच प्रश्नावली पाठवण्यात आली होती मात्र विरोधी पक्षनेत्यांना काही कारणामुळे उत्तरे देण्यात आली नाहीत. त्यामुळे त्यांना दोन दिवस आधीच अधिकाऱ्याने 160 नोटीस पाठवली होती, याचा अर्थ तुम्ही जबाब द्या, असं वळसे – पाटील म्हणाले.

 

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सायबर पोलिसांकडे (Mumbai BKC Cyber Police) आपला जबाब नोंदवला.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला.
यावर गृहमंत्र्यांनी आपली स्पष्टीकरण दिलं.

 

Advt.

Web Title :- Dilip Walse Patil | dilip walse patil clarification on mumbai bkc cyber police quizzed bjp leader devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा