Dilip Walse-Patil | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अटकेबाबतच्या विधानावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे प्रतिउत्तर; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Dilip Walse-Patil | एका वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला अटक करण्याचे प्रयत्न झाले, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले. त्यावर महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात गृहमंत्री असलेले दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी प्रतिउत्तर दिले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना हा दावा फेटाळून लावला.

एका वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासबाबतचे व्हिजन मांडले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला आहे. मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना आपल्या अटकेचे टार्गेट दिले गेले होते. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला. त्यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारण्यात आले असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

यावर बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या काळातील गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा कुठलाही प्रयत्न किंवा अशी कुठलीही योजना महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्हती. ते काय बोललेत मी ऐकलं नाही. परंतु, असा कुठलाही प्रयत्न किंवा अशी कुठलीही योजना महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्हती. ते त्यांच्या माहितीच्या आधारावर बोलले असतील. मात्र, मला जी माहिती आहे, राज्य सरकारनं असं काहीही केलेलं नाही.’ असे म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.

नक्की काय म्हणाले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :

वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की, ‘महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर, राजकीय वैर खासगी वैर असं काही नव्हतं, राजकीय वैर आणि खासगी मैत्री वेगळी असायची. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि तुमची खास मैत्री होती. पण गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून कटुता खूप वाढली आणि राजकीय वैर खासगी वैरात रूपांतरित झालं, असं वाटतयं..’

यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मी राजकीय वैर ठेवत नाही.
आमचं सरकार राजकीय वैरानं वाढणारही नाही.
पण या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या,
मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे (CP Sanjay Pande) यांना देण्यात आलं होतं.
अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत.
त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. पण कुठल्याही परिस्थितीत मला अडकवा आणि मला जेलमध्ये टाका,
असे आदेश महाविकास आघाडी सरकारमधील होते. हेदेखील सत्य आहे. पोलीस प्रशासनातील कोणालाही विचारलं,
तर तेदेखील हेच सांगतील.’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Web Title :-Dilip Walse-Patil | dilip walse patil reaction on devendra fadnavis allegations on maha vikas aghadi uddhav thackeray government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोटजातीत लग्न केल्याने श्रीगौड ब्राह्मण समाजाच्या जातपंचायतीने टाकले वाळीत, बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार

Devendra Fadnavis | ठाकरे-आंबेडकरांच्या युतीवर फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकरांना माहिती नाही की…’