Dilip Walse Patil | ‘भाजप नेत्यांवर कारवाई का करत नाही?’ शिवसेनेच्या सवालानंतर गृहमंत्री म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil | राज्यात सध्या गृहखात्यावरुन पेच रंगला आहे. भाजपविरोधात (BJP) पुरावे देऊनही राज्याच्या गृहमंत्रालयाकडून तत्परतेने कारवाई होत नसल्यामुळे शिवसेना (Shiv Sena) नाराज असल्याची चर्चा राज्यात पसरली आहे. कारवाई न होण्यावरुन शिवसेना नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज (शुक्रवारी) माहिती दिली आहे. त्यावेळी ते मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भाजपच्या बाबतीत सॉफ्टपणे वागते का ? असा सवाल गृहमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, ”सॉफ्ट आणि हार्ड भूमिका म्हणजे काय असते, हेच मला कळत नाही. मी समोर येतील त्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतो. कोणतीही कारवाई करायची झाल्यास ती न्यायालयात टिकली पाहिजे. त्यामुळे सॉफ्ट असायचे कारणच काय ? चूक असेल तिथे कारवाई होणारच,” असं ते म्हणाले.

 

पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले, ”पोलीस खाते आणि गृहखात्याला कायदे आणि नियमांच्याच आधारे कारभार करावा लागतो.
प्रत्येक प्रकरणात गृहमंत्री थेट आदेश देत नाहीत.
बहुतांश निर्णय हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांच्या स्तरावर होतात.
हे निर्णय घेताना विलंब होत असेल तर त्याची माहिती घेऊन त्याला गती देण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची असते.
ते काम आम्ही योग्यप्रकारे करत असल्याचं,” ते म्हणाले.

‘गृहखात्याने आणखी कणखरपणे वागायला पाहिजे,’ असं संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टिप्पणीवर वळसे पाटील म्हणाले की, ”मी संजय राऊत यांची भावना समजू शकतो.
आमच्या विभागाकडून काही कमतरता राहत असेल तर आम्ही त्यामध्ये जरूर सुधारणा करू, असं ते म्हणाले.
त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबतच्या आजच्या बैठकीत कुठेही गृहखात्याच्या कामासंदर्भात चर्चा झाली नाही.
आम्ही प्रशासकीय निर्णयासंदर्भात चर्चा केली असल्याचं,” त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Dilip Walse Patil | dilip walse patil reaction on shiv sena unhappiness about home ministry fail to take action against bjp leaders

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा