Dilip Walse Patil | ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान’ ! गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून पोलिसांचे तोंडभरून कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात (Gyarapatti-kotgul jungle) माओवाद्यांच्या (naxalite) विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रशंसा केली आहे. ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,’ अशा शब्दांत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पोलिसांचे कौतुक केले.

 

 

आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत 26 नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान (encounter) घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

 

 

नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-60 दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (Additional Superintendent of Police Somay Munde) आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्री वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात आज (शनिवार) पहाटे पासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक (Flint) झाली. यामध्ये तब्बल 26 नक्षलवाद्यांचा खात्मा (encounter) करण्यात पोलिसांना (Maharashtra Police) यश आल्याची प्राथमिक माहिती आहे. अपर पोलीस अधीक्षक यांनी काँबॅट ऑपरेशनसंदर्भात (combat operation) सविस्तर माहिती दिली. यामध्ये 26 हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Advt.

 

 

 

 

 

Web Title :- Dilip Walse Patil | encounter gadchiroli i am proud our police home minister dilip walse patil praised gadchiroli-police as well as maharashtra police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा