Dilip Walse Patil | फोन टॅपिंग प्रकरणात IPS रश्मी शुक्लांविरुद्ध कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) पुण्याच्या तत्कालीन आयुक्त (Pune Former CP) रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण अतिशय गांभीर्याने हाताळण्यात आले होते. यासाठी राज्याच्या विधानसभेत (Assembly) चर्चाही झाली. या चर्चेमध्ये गृहविभागाने (Home Department) आश्वासित केल्याप्रमाणे उच्चस्तरीय समितीमार्फ (High Level Committee) या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अहवालानुसार रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली.

 

दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले, या संदर्भात राज्य सरकारने (State Government) राज्यातील पोलीस महासंचालकांना (DGP) आणि आयुक्तांना (CP) योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रश्मी शुक्ला दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole), मंत्री बच्चू कडू (Minister Bachchu Kadu), आशिष देशमुख (Ashish Deshmukh), संजय काकडे (Sanjay Kakade) तसेच इतर लोकांचे फोन टॅप करण्यात आले होते. ज्यांचे फोन टॅप करण्यात आले होते त्यांचा संबंध ड्रग्ज (Drugs) अथवा तत्सम अंमली व्यवसायाशी असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते.

 

रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर (Central Deputation) कर्यरत असल्याने त्यांच्या संदर्भात नेमकी काय कारवाई करण्यात येईल
याची कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करु, असे वळसे पाटील यांनी सांगितले. ही कारवाई सूड भावनेतून केली गेली का,
अशा आशयाचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर गृहमंत्र्यांनी सूडभावनेचा कोणताही प्रश्न उद्भवत नसल्याचे सांगत प्रश्नाचे खंडन केले.

देशात कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करायचा असेल तर भारतीय तार अधिनियम (Indian Wire Act) 1985 कायद्यान्वये सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी,
आंतरिक सुरक्षेसाठी, दहशतवादी कृतींना प्रतिबंध करण्यासाठी, संवेदनशील दखलपात्र गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी
तसेच परदेशी मित्रराष्ट्रांचे हितसंबंध राखण्यासाठी अनुमती आहे.
मात्र यापैकी कोणतेही कारण नसताना रश्मी शुक्ला यांनी ज्या फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली त्यामध्ये व्यक्तींची नावे बदलून दुसऱ्या नावांची परवानगी घेतली होती.
यामध्ये नाना पटोले-अमजद खान, बच्चू कडू – निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे- तरबेज सुतार, आशिष देशमुख-रघु चोरगे अशा प्रकारची नावे देण्यात आली,
अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली. या व्यक्ती कॉलेज विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विकतात असा रिपोर्ट त्यांनी केला होता.
त्याआधारे ही टॅपिंगची परवानगी मिळवल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

 

Web Title :- Dilip Walse Patil | first reaction of hm dilip walse patil on fir against rashmi shukla in phone tapping case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | लॉजमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघींची सुटका

 

Asaduddin Owaisi | ‘नवाब मलिक जेलमध्ये आहेत, मग अजित पवार बाहेर कसे?’ असदुद्दीन ओवैसींचा सवाल (व्हिडीओ)

 

Multibagger Stock | 3 रुपये 71 पैशांच्या ‘या’ शेयरने 1 लाखाचे केले रू. 6.53 कोटी, आता जाईल रू. 2600 पर्यंत, एक्सपर्ट आहेत बुलिश