Dilip Walse Patil | पोलिसांच्या प्रतिमेबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना चिंता, DGP ऑफिसमध्ये घेतली आढावा बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil | अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळलेली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे. त्याअनुषंगाने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी मंगळवारी पोलीस महासंचालक कार्यालयात आढावा बैठक घेतली. मुंबईसह राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान, पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच सामूहिक प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पोलिसांची चांगली प्रतिमा सर्व सामान्य जनतेत निर्माण झाली पाहिजे. यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. छोट्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही केल्यास पोलिसांबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. त्यातून मोठ्या स्वरूपाचे गुन्हे टाळता येऊ शकतील. हे सर्व करण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. कोणत्याही घटनेचा तपास, गुन्हा नोंद अथवा अन्य आनुषंगिक कार्यवाही व कारवाई विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सायबर सुरक्षेसाठी नवनवीन प्रयोग, संशोधन आणि गुन्हे उकल करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना देत राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचाही आढावाही वळसे-पाटील यांनी घेतला.
ते म्हणाले, परिचित व्यक्तींकडूनच गुन्हे घडल्याचे निदर्शनास येत आहे.
पीडित महिलेची तक्रार तत्काळ नोंदवून त्याचा जलदगतीने तपास करावा. तसेच दक्षता समित्या नव्याने कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढत आहे.
त्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकत्रित कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.
अन्न व औषध प्रशासन विभागासोबत ग्रामीण भागातील वाढत्या अमली पदार्थाच्या सेवन व दळणवळणावर संयुक्तपणे कारवाई करण्याच्या सूचनाही दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केल्या.

हे देखील वाचा

Black death | पुन्हा पसरू शकते ’ब्लॅक डेथ’ नावाची महामारी, रशियन डॉक्टरने दिला इशारा

Sameer Wankhede Spying Case | समीर वानखेडे हेरगिरी प्रकरण ! मुंबई पोलीस आयुक्तांनी उचललं ‘हे’ पाऊल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Dilip Walse Patil | home minister Dilip Walse Patil concerned over police image take meeting at DGP office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update