Dilip Walse-Patil | मुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या कारभारावर नाराज?; दिलीप-वळसे पाटलांनी केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse-Patil | आता पार पडलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen Drive Bomb) टाकत महाविकास आघाडी सरकारला झटका दिला होता. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे गृहखात्याच्या कारभारावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर अजिबात नाराज नाहीत. प्रत्येकाची आपापली एक शैली असते. उलट माझ्यावर मुख्यमंत्र्यांनी माझ्या भाषणानंतर माझं फोन करून कौतुक केलं असल्याचं दिलीप वळसे-पाटलांनी (Dilip Walse-Patil) सांगितलं. मुंबईत (Mumbai) माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

 

दिलीप वळसे-पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात बैठक झाली.
राज्याचे नवनिर्वाचित गृहसचिव आनंद लिमये (Home Secretary Anand Limaye)
आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेसुद्धा (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) उपस्थित होते.
मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चा असल्याने बैठक झाली असल्याचं बोललं जात होतं. मात्र याबाबतही वळसे पाटलांनी माहिती दिली.

 

दरम्यान, या बैठकीत सार्वजनिक कामांबाबत चर्चा झाली असल्याचं सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या चर्चांणा पुर्णविराम मिळाला आहे.

 

Web Title :- Dilip Walse-Patil | Home minister dilip walse patil denied claim of cm uddhav thackeray upset with him regarding response on devendra fadnavis pendrive bomb

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary | यशवंत जाधवांच्या डायरीतील ‘मातोश्री’च्या उल्लेखाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान !

 

Chandrakant Patil | ‘तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडे, शिवसेना – काँग्रेस मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्या’ – चंद्रकांत पाटील

 

Pune Corporation | पुणे महापालिकेने ‘ई मोटारी’ घेतल्या पण चार्जिंगसाठी जावे लागते ‘भोसरी;ला