Dilip Walse Patil | दिलीप वळसे पाटलांचे पोलिसांना आवाहन, म्हणाले – ‘महिलांची सुरक्षा ही आपली जबाबदारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एखादी महिला पोलिसांकडे तक्रार घेऊन आली तर तिचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या. राज्यातील महिलांची सुरक्षा (Women’s Safety) ही आपली जबाबदारी आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) निर्भया पथकाचे (Nirbhaya Squad) थीम साँग आज मुख्यमंत्र्यांच्या (CM) हस्ते करण्यात आले. त्यावेळी दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) बोलत होते.

 

वळसे पाटील (Dilip Walse Patil) पुढे म्हणाले, आज प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day) औचित्य साधून निर्भया पथकाची सुरवात केली. त्यासाठी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शुभेच्छा. निर्भया प्रकरणानंतर गुन्हे (FIR) दाखल होण्याचं प्रमाण वाढलेले आहे. साकीनाका प्रकरणात (Sakinaka Case) पोलिसांचा प्रतिसाद किती जलद होता हे आपण पाहिलं आहे. याच प्रकरणात आरोपीला अटक करत 18 दिवसात आरोपपत्र (charge sheet) दाखल करण्यात आले.

महिलांवरील होणाऱ्या अत्याचाऱांच्या संख्येत वाढ होत आहे ही चिंता निर्माण करणारी बाब आहे.
80 ते 90 टक्के अपराध हे ओळखीच्या व्यक्तिंकडून होतात.
मग असं चित्र रंगवलं जातं की महिला सुरक्षित नाही आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केले जातात, असेही वळसे पाटील म्हणाले.

 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, शक्ती कायद्याच्या (Shakti Act) निमित्ताने माझ्या सहकाऱ्यांशी बोलताना महिला आणि पुरुष यांच्या मतात एक वाक्यता होती.
पोलीस दलाला माझी विनंती आहे की, जी महिला एखादी केस घेऊन येते तेव्हा तीचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे.
छोट्या गुन्ह्यांकडे जर दुर्लक्ष झालं तर ते वाढत जातात. त्यावर वेळीच कारवाई केली तर मोठे गुन्हे घडण्यास आळा बसेल आणि पोलिसांचा ही ताण कमी होईल.
महिला सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत ही भावना प्रत्येक महिलेला असायला हवी.

 

Web Title :- Dilip Walse Patil | mumbai police dilip walse patil on nirbhaya pathak theam song launch

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा