Dilip Walse Patil | मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर अवमान खटला चालवण्यात येणार; जबाब नोंदवण्याबाबत हायकोर्टाचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Dilip Walse Patil | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्यावर अवमान खटला चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना सहा आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

एका सहकार प्रकरणी महाराष्ट्र सहकार सोसायटी कायद्याच्या अंतर्गत हरिभाऊ मोहोड या याचिकाकर्त्याने राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे अपील केले होते. मात्र, या अपिलावर कित्येक महिने सुनावणी न झाल्याने हरिभाऊ मोहोड यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. १९ जानेवारी २००४ रोजी चार आठवड्यामध्ये या अपिलावर सुनावणी केली जाईल, असं शासनाच्या वतीने न्यायालयाला माहिती देण्यात आली.

यानंतर उच्च न्यायालयाने मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना चार आठवड्याचा अवधी देण्यात आला. मात्र, या कालावधीनंतरही आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही सुनावणी झाली नाही. यामुळं याप्रकरणी उच्च न्यायालयाने वळसे-पाटील यांना नोटीस दिली आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतरही एका सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्यामुळं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर न्यायालय अवमान खटला चालवण्यात येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांकडून वाहनांची तोडफोड, तोडफोड करताना बनवले रिल्स (Video)

Adani Group | अदानी ग्रुपच्या नावावर होणार सिमेंट इंडस्ट्रीचा मुकुट! नंबर-1 बनण्यासाठी काय आहे कंपनीचा प्‍लान?

Loni Kalbhor Pune Crime News | लोणी काळभोरमध्ये वाहनांची तोडफोड, दहशत परसवणाऱ्या टोळक्यांवर FIR