Dilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा!; गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एक पत्रक काढण्यात आले आहे. यात नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला (maratha reservation) पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे. मराठा समाजाने (Maratha society) दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा त्यामध्ये देण्यात आलेला आहे. नक्षलवादी चळवळीकडून मराठा समाजातील तरुणांना त्यांच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज मत मांडलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

यावेळी गृहमंत्री वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) म्हणाले, की “नक्षली चळवळ ही व्यवस्थेच्या विरोधातील आहे आणि व्यवस्थेच्या विरोधात जी लोकं काम करतात त्यांनी अन्य लोकांना तुम्ही आमच्यात या, संघर्ष करा असे सांगणे म्हणजे एक प्रकारे देशाच्या व्यवस्थेला आव्हान देण्यासारखेच आहे किंवा धोका निर्माण करण्यासारखंच आहे. त्यामुळे त्यांच्या आव्हानाचा फार विचार करण्याची गरज नाही. बाकी आपल्या लोकशाही राज्यात राज्यघटना, सरकार(Government), न्यायालय (Court) या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवले जात आहेत.”

 

खरे शत्रू ओळखले पाहिजे

“मराठा समाजातील मूठभर दलाल, भांडवलदार मराठा समाजाच्या अधोगतीला जबाबदार आहेत. तेव्हा मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळय़ांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्याकरिता मैदानात उतरावे. भारतीय क्रांतीचा विजय करण्याकरिता क्रांतीला अभिप्रेत असलेल्या विचारांनी आपली ताकद मजबूत करा. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत असून तुमची वाट पाहत आहे.”, असे म्हणत माओवादी राज्य समिती सचिव सहय़ाद्री याने मराठा आरक्षणाला नक्षलींचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

नक्षलवाद्यांनो या…
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना (Naxalite organization) करत असल्याचे माझ्या वाचनात आले.
‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असेही ते म्हणाले.
उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो.
“नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात.”
अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी दिली आहे.

Wab Title :- Dilip Walse Patil | naxals support maratha reservation home minister walse patil responded saying

Ramdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही’, आठवलेंचा नाना पटोलेंना सल्ला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा