Dilip Walse Patil | एकनाथ शिंदेना सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप, माजी गृहमंत्री वळसे-पाटलांचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील (Shinde Group) संघर्षही दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. यातच आता एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवली (Security Provided) नसल्यावरुन बंडखोर आमदारांनी (Rebel MLA) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठा खुलासा केला आहे. बंडखोर आमदारांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करुन एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्यात आली होती, असा खुलासा दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी (Threat from Naxalites) मिळाल्यानंतर तत्कालीन सरकारने त्यांना सुरक्षा पुरवण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिंदे यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी फोन करुन तुम्ही असे आदेश देऊ शकत नाही. शिंदे यांना कोणतीही सुरक्षा देऊ नये, अशा सूचना दिल्याचा मोठा दावा कांदे यांनी केला. यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
वळसे पाटील यांनी शिंदे गटाकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावत यामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या मुलाने पत्र लिहून झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) मागितली होती.
मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून कधीच सुरक्षेची मागणी करण्यात आली नाही.
शिंदे यांना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर
त्यांची अधिक काळजी घेण्याच्या संदर्भात सूचना ठाणे पोलिसांना (Thane Police), पोलीस विभागाला दिल्या होत्या.
त्यामुळे ही चर्चा अनावश्यक आहे. अशा प्रकारची पत्रे सार्वजनिक जीवनात येत असतात.
पोलीस विभाग त्याचे विश्लेषण करुन त्यावर काय कारवाई करायची हे ठरवते, असेही वळसे-पाटील यांनी सांगितले.
Web Title :- Dilip Walse Patil | ncp-leader and former maharashtra home minister dilip walse patil reaction over allegations of uddhav thackeray not provide appropriate security to eknath shinde
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PAN Card स्मार्टफोनमध्ये असे डाऊनलोड करू शकतात यूजर्स, येथे जाणून घ्या पूर्ण पद्धत