Dilip Walse Patil On BJP Leader | ‘भाजपवाले सगळेच धुतल्या तांदळासारखे आहेत का?’ – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil On BJP Leader | मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा लागला आहे. यामुळे राजकीय वातावरण तंग झालं आहे. यावरुन आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil On BJP Leader) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ”केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून लोकशाहीत भाजपला (BJP) विरोध करणाऱ्या नेत्यांना अडचणीत आणुन सहकारी संस्था संपविण्याचे काम केंद्र सरकार (Central Government) करत आहे. भाजपवाले सगळेच धुतल्या तांदळा सारखे आहेत का? त्यांच्यावर का धाडी पडत नाही?” असा प्रश्न गृहमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.

शिरूर तालुक्यातील (Shirur) मलठण येथे विविध विकास कामांच्या कार्यक्रमाप्रसंगी गृहमंत्री वळसे पाटील (Dilip Walse Patil On BJP Leader) बोलत होते. ”काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचा इतिहास पुसण्याचे काम सुरु आहे. जाती धर्मात विष पेरून राजकीय पोळी भाजून घेण्याचे षडयंत्र हे देशासाठी खुप धोकादायक आहे. तसेच, शरद पवार यांनी या राज्यात सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या राज्यांतील जनतेच्या जीवनात विज, पाणी, धरणे, रस्ते, उदयोगधंदे या माध्यमातून विकास करण्याचे काम शरद पवार यांनी केले. मात्र काही लोक फक्त पवारांचे नाव घेऊन टिका करायची, धर्माधर्मात भांडणे लावण्याचे काम करत आहेत.” असं वळसे पाटलांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं.

दरम्यान, भाषण सुरु असतानाच अचानक अजानाचा आवाज आला. त्यावेळी तात्काळ गृहमंत्री वळसे-पाटील यांनी भाषण बंद केले आणि शांत उभे राहीले. व अजान संपल्यावर पुन्हा भाषण सुरु केले. ”प्रत्येक धर्माचा आदर करण्याचे काम सर्वानी केले पाहीजे. हा देश एकसंघ व येथील जनतेची एकात्मता टिकविण्यासाठी अनेक साधुसंत,
विचारवंत, नेते, स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक यांनी कष्ट केले आहेत.
पण, सध्या जाती धर्मात मतभेद निर्माण करीत विष पेरण्याचे काम काही लोक करत आहेत.
हे मोठे दुर्देव असुन याबाबत कार्यकर्त्यांनी जागृती निर्माण केली पाहीजे.” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Dilip Walse Patil On BJP Leader | are the bjp leaders all like washed rice question from home minister dilip walse patil


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Beed Crime | दुर्देवी ! सेल्फीचा मोह बेतला जीवावर; नवदाम्पत्यासह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

Benefits OF Honey And Nutmeg | जाणून घ्या मध आणि जायफळ एकत्र खाण्याचे अनेक फायदे

Pune Crime | धक्कादायक ! पिंपरीत DTDC कुरिअरने मागवल्या 97 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान