पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil on Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा आम्ही हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) चालवू असा इशारा दिला. परंतु यामुळे पहाटेच्या काकड आरत्या, रात्रीची कीर्तने बंद होणार आहेत. यांचा परिणाम मुस्लिम धर्माबरोबरचं हिंदु धर्माच्या कार्यक्रमावर देखील होणार आहे, हे राज ठाकरे यांना माहीत नाही का? असा सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी उपस्थित केला. (Dilip Walse Patil on Raj Thackeray)
टाकळी हाजी (Takali Haji Pune) येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. दिलीप वळसे पाटील म्हणाले, ”कंत्राट घेणाऱ्या पक्षांना हाताशी धरून भाजप (BJP) राज्यात सामाजिक अशांतता पसरवत आहे. जाती धर्मात वाद लावायचे, हिंदूंचे रक्षणकर्ते असल्याचे दाखवायचे आणि मतांचे ध्रुवीकरण करायचे हाच कार्यक्रम सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जी राज्यात परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मुस्लिमांनी जी सामंजस्याची भूमिका घेतली त्याबदद्ल गृहमंत्र्यांनी जाहीर आभार मानले. आपल्या देशाची उभारणी कोणी केली हे तरुणांना सांगण्याची गरज आहे. मात्र सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पोहोचवण्याचे काम काहीजण करत असल्याचेही,” त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर झालेल्या टिकेवरही दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, ”नेत्यावर झालेल्या टीकेला कार्यकर्त्यांनी उत्तर दिले पाहिजे. खालच्या पातळीवर टीका सहन केली जाणार नाही.
लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. इथला परिसर शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे.
मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. अंतर्गत मतभेद, गट तट विसरून विकासासाठी एकत्र यावे,” असे आवाहनही वळसे पाटील यांनी केले.
Web Title : Dilip Walse Patil on Raj Thackeray | due to the role of speakers kakad aarti will also be closed doesnt raj thackeray know this question from dilip walse patil pune news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर
Maharashtra Monsoon Updates | मान्सून आला..! महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पावसाचं आगमन होणार – IMD
MLA Sangram Jagtap BMW Car Accident | राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात