Dilip Walse Patil On Raj Thackeray | मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याच्या राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil On Raj Thackeray | गुढीपाडव्यानिमित्त (शनिवारी) शिवाजी पार्क मैदानात (Shivaji Park, Mumbai) झालेल्या मनसेच्या (MNS) मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेश राज ठाकरे यांनी मनसेसैनिकांना दिला. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे.
अजानचा भोंगा आहे म्हणून हनुमान चालिसा लावू हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही.
मग कधी हिंदू, मुस्लिम, जात – धर्म, दुसऱ्या राज्यात घडलेल्या घटनांचे मोर्चे राज्यात काढले जातात त्यावेळी राजकारणाचा दर्जा घसरलेला दिसत आहे”, अशी टीका त्यांनी केली. (Dilip Walse Patil On Raj Thackeray)

 

पुढेे वळसे पाटील म्हणाले, “प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे. अजानचे भोंगे लावायचे आहेत त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे.
ज्यांना हनुमान चालिसा लावायची आहे त्यांनीही जरुर लावावी पण तिकडे होते त्याचवेळी लावू हे योग्य नाही.
विरोधी पक्षाच्या लोकांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे. आम्ही कोर्टाचा आदेश मान्य करु.”

”आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे तशी कधीही नव्हती.
आजपर्यंत देशात अनेक सरकारं आली, पण आज केंद्रीय यंत्रणांचा वापर ज्या पद्दतीने केला जात आहे तसा आधी नव्हता,” असं देखील वळसे पाटील म्हणाले.
तर, ”महाराष्ट्राचे राजकारण प्रगल्भ होतं. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन कामं झाली आहेत.
पण आज फक्त विरोधात बोला आणि कारवाई करु असं सुरु आहे. राज्यात पोलीस असताना केंद्रीय यंत्रणा पोलीस देखील केंद्रातून घेऊन येत असतील तर राज्याच्या व्यवस्थेवरील केंद्र सरकारचा (Central Government) विश्वास किती आहे हे सिद्ध होतं.
मग त्यातून षडयंत्र करत राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Dilip Walse Patil On Raj Thackeray | Maharashtra home minister dilip walse patil on mns raj thackeray masjid hanuman chalisa

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा