Dilip Walse Patil On Silver Oak Attack | पोलिस बंदोबस्ताबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘गुप्तचर विभागानं…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil On Silver Oak Attack | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी अचानक काही एसटी कामगारांनी (ST Workers Strike) गोंधळ घातला होता. त्यावेळी कामगार (MSRTC Workers) आक्रमक होत पवार यांच्या घरावर चप्पल, दगडफेक देखील करण्यात आली. यानंतर वातावरण तंग झालं. याप्रकरणी आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक (Arrested) करण्यात आली असून त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिसांवर (Mumbai Police) सवाल उपस्थित केला होता. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. (Dilip Walse Patil On Silver Oak Attack)

माध्यमांशी बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की गुप्तचर विभागाने Maharashtra State Intelligence Department (SID) कळवूनही पोलिसांनी हवा तेवढा बंदोबस्त ठेवला नाही,” असं ते म्हणाले. “याबाबत रीतसर चौकशी सुरू आहे आणि या चौकशीत पोलिसांना जी काही माहिती मिळत आहे, ती माहिती पोलीस न्यायालयात सादर करत आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात नक्की चौकशीचा भाग काय आहे, काय नाही ? हे आता कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना, उघड करणे काही योग्य होणार नाही.” असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. (Dilip Walse Patil On Silver Oak Attack)

पुढे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “ही गोष्ट खरी आहे की 4 एप्रिल रोजी गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळवलं होतं, तरी देखील कमतरता राहिली. जेवढ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवायला हवा होता, तेवढा ठेवला गेला नाही. या संदर्भात चौकशी आदेशीत केलेली आहे. संबंधित पोलीस उपायुक्तांची (DCP) बदली केली आहे, गावदेवीच्या (Gamdevi Police Station) पोलीस निरीक्षकास निलंबित (Police Inspector Suspended) केलेलं आहे. चौकशी सुरू आहे, चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करू.” असं ते म्हणाले.

Web Title : Dilip Walse Patil On Silver Oak Attack | silver oak attack police did
not provide adequate security despite intelligence report home minister walses big statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून