Dilip Walse Patil | ‘उद्या माझ्या उत्तरानंतर दुध का दुध पानी का पानी होईल, करारा जबाब मिलेगा’ – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्टिंग ऑपरेशनचं पेन ड्राईव्ह (Sting Operation Pen Drive) सादर करुन एकच खळबळ उडवून दिली. फडणवीस यांनी केलेल्या गंभीर आरोपांची राज्य सरकारने (State Government) दखल घेत या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी बोलावून घेतले होते. या बैठकीमध्ये सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) यांनी सर्व कागदपत्रे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याकडे सादर केल्याची माहिती समोर येत आहे.

 

भाजप आमदार गिरीश महाजन (BJP MLA Girish Mahajan) प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केल्यानंतर तपास अधिकारी (Investigating Officer) सुषमा चव्हाण या पुण्यातून (Pune) थेट मुंबईमध्ये (Mumbai) दाखल झाल्या आहेत. आज सकाळी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांची भेट घेतली आणि संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर सुषमा चव्हाण आणि संजय पांडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची भेट घेतली. यावेळी सुषमा चव्हाण यांनी आपल्यासोबत आणलेली कागदपत्र गृहमंत्र्यांकडे सुपूर्द केली. त्यांनी ही सर्व कागदपत्रे पुणे कार्यालयातून आणली होती.

 

‘करारा जबाब मिलेगा’ भाजपला दिला इशारा

दरम्यान, बैठकीपूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
काल सभागृहात विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज उत्तर देणार होतो.
त्यासाठी तयार होतो. मात्र त्यांनी मागणी केली होती की, उद्या चर्चा व्हावी.
त्यामुळे मी उद्या यावर उत्तर देईल. त्यांनी खरेतर कायदा सुव्यवस्था (Law and Order) यावर बोलायचे होते.
परंतु ते त्यांच्या कर्तव्यापासून दूर गेले. उद्या माझ्या उत्तरानंतर दुध का दुध पानी का पानी होईल, ‘करारा जबाब मिलेगा’ असे म्हणत त्यांनी भाजपला (BJP) इशारा दिला.

 

Web Title :- Dilip Walse Patil | Pune ACP sushma chavan submits all documents to home minister regarding devendra fadnavis allegations

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा