Dilip Walse Patil | ‘मी देखील थोडा कायदा शिकलोय’; असं का म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस बदल्यांचा घोटाळा (Maharashtra Police Transfer Scam) उघड करताना मी सभागृहात दिलेल्या माहितीचा स्त्रोत उघड करणे मला बंधनकारक नाही. विरोधी पक्षनेता (Opposition Leader) म्हणून मला काही विशेष अधिकार आहेत, असा दावा करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रत्युत्तर दिले. मी देखील थोडा कायदा (Law) शिकलो आहे. माझ्याकडे असणाऱ्या माहितीत फरक असेल. परंतु क्रिमिनल केसेसमध्ये (Criminal Case) कोणालाही इम्युनिटी (Immunity) नसते, असे सांगत दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीसीचे समर्थन केले.

 

विरोधी पक्षनेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न नाही
दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले, प्रोटोकॉल (Protocol) आणि प्रिव्हलेज (Privilege) मलाही माहिती आहे. सभागृहातील सदस्यांच्या अधिकाराबाबत माझं दुमत नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी (Mumbai Police) पाठवलेली नोटीस (Notice) ही आरोपी म्हणून नव्हे तर जबाब नोंदवण्यासाठी होती. राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) चुकीच्या पद्धतीने फोन टॅपिंग (Phone Tapping) करण्यात आले. फडणवीस यांना ही माहिती कुठून मिळाली, केवळ इतकेच पोलिसांना जाणून घ्यायचे होते. यामध्ये विरोधी पक्षनेत्यांना अडचणीत आणण्याचा किंवा त्यांना कटात गोवण्याचा प्रश्नच येत नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले.

या प्रकरणात 24 लोकांचे जबाब नोंदवले
विरोधी पक्षनेत्यांनी हा प्रश्न सभागृहात मांडला होता. राज्य सरकारने (Maharashtra Government) या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीच्या अहवालानुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 24 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली.

 

म्हणून फडणवीसांना नोटीस पाठवली
याच तपासासाठी देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी 160 अंतर्गत नोटीस बजावली होती.
पोलिसांनी त्यांना आधीही नोटीस पाठवल्या होत्या, प्रश्नावलीही पाठवली होती.
मात्र फडणवीस यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना नोटीस पाठवली.
याचा अर्थ जबाब नोंदवावा इतकाच होता, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

Web Title :- Dilip Walse Patil | vidhansabha adhiveshan dilip walse patil on devendra fadnavis statement by mumbai police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा