‘या’ चित्रपटामध्ये सनी लियोनीचं एकदम ‘कडक’ आइटम सॉन्ग !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘अर्जुन पटियाला’ चित्रपटाचा ट्रेलरमध्ये सांगितले होते की, यामध्ये एक मैनडेटरी आइटम सॉन्गही आहे. त्या दरम्यान गाण्यामध्ये अभिनेत्री सनी लिओनीची एक झलक पहायला मिळाली होती. यामध्ये दिलजीत दोसांझ, वरुण शर्मा आणि सनी लिओनी दिसत आहे. हे गाणे सिंगर गुरु रंधावाने गायले आहे. यामध्ये सनीचे किलर मूव्स पहायला मिळत आहे.

कृतिने हे गाणे इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. कृतिने लिहले की, ‘जसे आम्ही वचन दिले होते की, या चित्रपटामध्ये सनी आहे.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित जुगराजने केले आहे. चित्रपटात कृति सेननने एक रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. या व्यतिरिक्त दिलजीत दोसांझ एसीपी अर्जुन पटियाला आणि फुकरे फेम वरुण शर्मा डीसीपी ओनिडा सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे.

या आधी अभिनेता दिलजीतने ‘उडता पंजाब’ आणि ‘फिल्लौरी’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. या व्यतिरिक्त दिलजीत अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘गुड न्यूज’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पुर्ण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा आडवाणी देखील दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/BzcVKRfAr8C/?utm_source=ig_embed

कृति सेननबद्दल बोलायचे म्हणले तर, ती यावर्षी ‘लुका छिपी’ आणि ‘कलंक’ चित्रपटात दिसून आली होती. ‘लुका छिपी’ मध्ये ती कार्तिक आर्यनच्या लव इंटरेस्टच्या रुपात दिसून आली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कमाई केली होती. या व्यतिरिक्त कृति सेननने चित्रपट ‘हाउसफुल 4’ आणि ‘पानीपत’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. ‘पानीपत’ एक पीरियड ड्रामा मल्टिस्टार चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन आशुतोष गोवारी करत आहे. या चित्रपटात कृतिसोबत अर्जुन कपूर आणि संजय दत्त दिसणार आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?