डिंपल कपाडियानं अंग्रेजी मीडियमचे डायरेक्टर होमींना बनवलं ‘बेवकूफ’, केलं ‘हे’ काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – होमी अदडजानिया दिग्दर्शित अंग्रेजी मीडियम सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आल होता. ट्रेलरनंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहे. इरफान खान आणि करीना कपूर स्टारर हा सिनेमा खूप रोचक आहे. सिनेमात डिंपल कपाडिया हिनंही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. डिंपलची सिनेमातील कास्टींग गोष्टही निराळीच आहे.

डिंपलनं होमीकडून करून घेतलं आपलं स्क्रीन टेस्ट शुट
फिल्म क्रिटीक राजीव मसंद यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या कॉलममध्ये सांगितलं आहे की, डिंपल कपाडियानं होमी अदजानियाकडूनच आपला हॉलिवूड सिनेमा टॅनेटसाठी स्क्रीन टेस्ट शुट केलं होतं. राजीव यांच्या माहितीनुसार, होमी अदजानिया जेव्हा अंग्रेजी मीडियम बनवत होते, त्यांनी डिंपल कपाडियासाठी एक रोल राखून ठेवला होता. यानंतर होमी यांनी डिंपलला फोन करून अंग्रेजी मीडियमबद्दल सांगितलं. त्यावेळी तर डिंपलनं स्क्रिप्ट न ऐकताच सिनेमासाठी होकार दिला. नंतर काही दिवसांवनी तिनं होमी यांना घरी बोलावलं. तिला सिनेमातील रोलबद्दल माहिती घ्यायची होती.”

राजीव मसंद यांनीच खुलासा केला आहे की, “डिंपलनं होमी अदजानिया यांना घरी बोलवलं तर खरं परंतु, आपल्या रोलविषयी माहिती घेण्याऐवजी डिंपलनं होमीच्या हातात कॅमेरा दिला. डिंपलनं होमी अदजानियाकडून टेनेट सिनेमासाठी आपलं स्क्रीन टेस्ट शुट केलं.”

डिंपलच्या टेनेट सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हॉलिवूड डायेरक्टर क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित टेनेट हा सिनेमा 17 जुलै 2020 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेममात जॉन डेविड वॉशिंग्टन, रॉबर्ट पॅटिंसन, डिंपल कपाडिया प्रमुख भूमिकेत असणार आहेत. भारतातही या सिनेमाची शुटींग झाली आहे.

डिंपल आणि होमी क्लोज फ्रेंड्स
डिंपल कपाडिया आणि होमी अदजानिया एकमेकांचे क्लोज फ्रेंड्स आहेत. डिंपलनं होमीच्या कॉकटेल आणि फाइंडिंग फॅनी या सिनेमात काम केलं आहे. होमीचा अंग्रेजी मीडियाम सिनेमा 13 मार्च रोजी रिलीज होणार आहे.