खळबळजनक ! सत्र न्यायालयाच्या ६व्या मजल्यावरून उडी मारून बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पवईतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने दिंडोशी सत्र न्यायालयाच्या ६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

विकास पवार असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

पॉस्कोच्या गुन्ह्यात केली होती अटक
पवई येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी विकास पवार याच्यावर पॉस्कोचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात २०१५ मध्ये विकास पवार याला अटक करण्यात आली होती.

गार्डच्या हाताला हिसका मारून उडी मारली
त्याला आर्थर रोड तुरुंगातून आज सुनावणीसाठी दिंडोशी सत्र न्यायालयात घेऊन पोलीस आले होते. त्यावेळी त्याने सोबत आलेल्या पोलीस गार्डच्या हाताला झटका देऊन तो पळाला. त्यानंतर त्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?
चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार
डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव
केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

Loading...
You might also like