‘या’ खेळाडूने १२ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता आणि आता जाहीर केली क्रिकेट मधून निवृत्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्रिकेट हा खेळ भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. क्रिकेटशी संबंधित सातत्याने नवीन गोष्टी ऐकायला येत असतात. अशीच एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे, दिनेश मोंगियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. या खेळाडूने तब्बल १२ वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आपल्या ७ वर्षाच्या एकदिवसीय क्रिकेट करिअर मध्ये त्याने केवळ एक शतक केले होते. परंतु २००२ साली गुवाहाटी मध्ये झिम्बाम्ब्वे विरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत तो सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू ठरला होता.

Dinesh Mongia

क्रिकेट विश्व् कप स्पर्धा-२००३ मध्ये भारतीय संघाचा भाग होता
तब्बल १२ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर राहिलेल्या दिनेश मोंगियाने बुधवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली. मोंगिया २००३ साली पार पडलेल्या विश्व् कप स्पर्धेत भारतीय संघाचा तो एक भाग होता. दिनेश मोंगियाला बीसीसीआयने इंडियन क्रिकेट लीग (ICL) मध्ये भाग घेण्यासाठी बंदी घातल्यानंतर तो शेवटचा सामना २००७ साली पंजाबकडून खेळला होता. या खेळाडूने आपले अंडर-१९ क्रिकेट मधील पदार्पण ऑक्टोबर १९९५ मध्ये केले होते. प्रथम श्रेणीच्या क्रिकेट मध्ये मोंगियाने ८०२८ धावा काढल्या आहेत. त्याने २०००-२००१ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते.

प्रथम श्रेणी क्रिकेट मधील प्रदर्शन समाधानकारक
या डावखुऱ्या फलंदाजाने ५७ एकदिवसीय सामन्यांमध्ये २७.९५ च्या सरासरीने १२३० धावा केल्या आहेत. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १५९ धावा होती. मोंगियाने भारतासाठी एक टी-२० सामना सुद्धा खेळला असून नंतर तो सामन्यांमध्ये कधी दिसला नाही. प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेट मध्ये १२१ सामन्यांमध्ये त्याने २१ शतक बनवले आहेत. तसेच प्रथम श्रेणीच्या क्रिकेट मध्ये मोंगियाने ८०२८ धावा काढल्या आहेत. मोंगियाने लँकेशायर आणि लेसिस्टशायर कडूनही सामने खेळले आहेत. एवढे वर्ष क्रिकेट पासून दूर राहिल्यानंतर आज सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

Visit – policenama.com