महामार्गावर बसली जेवणाची पंगत ; शिर्डीतील अनोखे आंदोलन 

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन

सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. या पार्शवभूमिवर राज्यातील विविध ठिकाणी वेगेवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. कुठे चक्का जाम तर कुठे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. पण  शिर्डी पासून १३ किमी अंतरावर असलेल्या  पिंपरी निर्मळ या गावात मराठा सामाजाकडून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. जवळपास पाच हजार मराठा आंदोलकांनी नगर-मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन करीत शिरा, मसाले भात असा  स्वयंपाक तयार केला आणि रस्त्यावरच  आंदोलकांनी पंगती मांडून जेवण केले.अशा प्रकारे करण्यात आलेले हे पहिलेच आंदोलन आहे असे म्हणावे लागेल.
[amazon_link asins=’B01951R2S2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f171c49-9bcb-11e8-a5f1-011d73a10f61′]

दरम्यान, संपूर्ण नगर जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी संकेत गाढे या सातवीत शिकणाऱ्या मराठा विद्यार्थ्यानं छोटेखानी भाषणातून ‘आरक्षण आमच्या हक्काचे- नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतो देणार नाही -घेतल्याशिवाय राहणार नाही.’ अशा घोषणा दिल्या.

कधीही बंद मध्ये सहभागी न होणाऱ्या शिर्डी शहरात बंद पाळून मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. शिर्डीतील बंदमुळं भाविकांची गैर सोय झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र संस्थानच्या प्रसादलये उघडे असल्यानं भाविकांना आधार मिळाला असला तरी एस टी सेवा बंद असल्यानं आलेले भाविक शिर्डीतच अडकून पडले आहेत.