‘या’ कारणामुळे भारताची एकमेव जिम्नॅस्ट वर्ल्डकपमधून बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला गुडघेदुखीमुळे वर्ल्डकप स्पर्धेला मुकावे लागणार आहे. तसेच  गुडघेदुखीमुळे २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही तिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती आशियाई स्पर्धेमध्ये वॉल्ट अंतिम सामन्यात खेळू शकली नव्हती.

आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकाराच्या पात्रता फेरीत १४.४६६ आणि १४.१३३ गुणांची कमाई करून एकूण १४.२९९ गुणांसह तिने अंतिम फेरीत धडक मारली होती. पहिल्या फेरीत उडी मारल्यानंतर तिला दुखापत जाणवू लागल्याने तिने माघार घेतली. या दुखापतीमुळे तिला पुढील आठवड्यात होत असलेल्या दोहा वर्ल्डकपमध्ये सहभागी होता येणार नाही.

भारतीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनचे उपाध्यक्ष रियाझ भाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या अंतिम फेरीपूर्वीच तिच्या गुडघ्याला त्रास जाणवत होता. व्हॉल्टच्या अंतिम फेरीतील पहिल्या प्रयत्नात तिला वेदना जाणवली. त्यामुळे दुसरा व्हॉल्ट तिने केला नाही. त्यामुळे या स्पर्धेतील तिचे आव्हान संपुष्टात आले. आता ती भारतात परत येऊन उपचार घेईल. पण आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याचा तिचा प्रयत्न असेल.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिने जर्मनीत झालेल्या वर्ल्डकपमध्ये ब्राँझ जिंकले होते. दीपाने तुर्की येथे जुलैत झालेल्या कलात्मक जिम्नॅस्टिक विश्व स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते.

दीपा कर्माकर विषयी –
त्रिपुराची दीपा कर्माकर ही भारतातर्फे ऑलिम्पिक्स स्पर्धेत उतरणारी पहिलीच महिला जिम्नॅस्ट आहे. रिओ इथं २०१६ मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक्स स्पर्धेत ती सहभागी झाली होती. प्रदुनोवा व्हॉल्ट हा धोकादायक प्रकार आत्मसात करणारी ती जिम्नॅस्टिक्सच्या इतिहासातील केवळ पाचवी महिला आहे. ती पाच वर्षांची असताना, वेटलिफ्टिंगपटू असलेले तिचे वडील दुलाल कर्माकर यांनी तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सोमा नंदी हे तिचे पहिले प्रशिक्षक होते. त्यानंतर राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स विजेते बिश्वेश्वर नंदी यांनी तिच्या प्रशिक्षणाची धुरा सांभाळली.

दीपा अवघी नऊ वर्षांची असताना, तिनं २००२ सालच्या ईशान्य विभागीय खेळांमध्ये बॅलन्सिंग बीम या प्रकारातल्या स्पर्धेत भाग घेतला आणि सुवर्णपदक जिंकलं. सन २०१६ मध्ये, २३ वर्षांची दीपा आपलं हे कौशल्य रिओ ऑलिम्पिक्समध्ये तीच पदक केवळ ०.१५ गुणांनी हुकलं. सन २०१४ मध्ये दीपानं ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवलं. २०१५ सालच्या हिरोशिमा आशियाई खेळांमध्येही तिनं पदक जिंकलं. दीपाला प्रतिष्ठेचा खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्री हा सन्मान मिळाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us