Dipak Kesarkar | …नाहीतर शिवसेनेचे सगळे आमदार आले असते, दीपक केसरकरांची शिवसेनेवर टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे प्रवक्ते (Shinde Group Spokesperson) दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी आज भाजप खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली. पुण्यातील विश्रामगृहात (Rest Houses in Pune) या दोन नेत्यांची भेट झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शिंदे गटाने जो उठाव केला तो उठाव करायला धैर्य लागतं नाहीतर शिवसेनेचे (Shivsena) सगळे आमदार आले असते, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

 

 

दीपक केसरकर (Dipak Kesarkar) म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) याचे जोरदार स्वागत झालं. कॅबिनेट सामूहिक जबाबदारी असते. स्वातंत्र्याचा (Independence) अमृत महोत्सव साजरा (Celebration of Amrit Mahotsav) करत असताना अनेक शहरामध्ये जाणार आहे. त्या शहरातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या शहरात देखील भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

बच्चू कडूंचा योग्य मान राखला जाईल

मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला. 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर सगळेच मंत्री कामाला लागले असून लवकरच खाते वाटप केले जाईल. आमच्यातले आमदार नाराज नाहीत. पहिल्या टप्प्यात अनेकजण मंत्रीपद सोडून आले होते. आम्ही सगळे गेलो त्यावेळी 7 मंत्री होते. मनाचा मोठेपणा थोडा पहिल्या टप्प्यात दाखवावा लागतो. मंत्रिपदाचा दुसरा टप्पा येईल त्यावेळी सगळ्यांना संधी मिळेल. बच्चू कडू (Bachu Kadu) यांचा देखील योग्य मान राखला जाईल, असेही केसरकरांनी स्पष्ट केलं.

 

तर राठोडांची चौकशी होईल

कलंकित मंत्री हा आरोप एक वर्षापूर्वी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर झाला होता.
तो आरोप सिद्ध झालेला नाही. एका समाजाला मंत्रीपद द्यावे यासाठी बंजारा समाजाला दिलेले वचन मुख्यमंत्र्यांनी पाळले.
तरुणीच्या आत्महत्येची चौकशी अजुन सुरु आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणत असतील तर चौकशी होईल.
नि: पक्षपातीपणे चौकशी केली जाईल. मात्र जर दोषी नसतील तर मंत्री का देऊ नये, त्यांचा दोष आढळला तर कारवाई झाली असती, असेही केसरकर म्हणाले.

 

 

Web Title : – Dipak Kesarkar | dipak kesarkar talk about political crises sanjay rathod in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा