औषधे, घरचे जेवण मिळण्यासाठी दीपक मानकरांचा न्यायालयात अर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
शहरातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दीपक मानकर यांनी औषधे आणि घरचे जेवण मिळावे यासाठी मोक्का न्यायालयात अर्ज केला आहे. मोक्का कोर्टाचे विशेष न्यायाधीश ए.एस महात्मे यांच्या समोर दीपक मानकर यांच्या अर्जावर सोमवारी (दि.२७) सुनावणी होणार आहे.

[amazon_link asins=’B077L4X3PN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4d17835f-a7ac-11e8-9787-7d0f77ab4d77′]

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्याप्रकरणी मानकर यांच्यासह इतरांवरती गुन्हा दाखल आहे. २ जूनला जगताप यांनी रेल्वे खाली आत्महत्या केली होती. आपल्या आत्महत्येस दीपक मानकर हे जबाबदार असल्याची चिठ्ठी जगताप यांनी लिहून ठेवली होती. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी मानकर हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर १० दिवसात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ते पोलिसांना शरण आले होते. अटक केल्यानंतर त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला.

दीपक मानकर यांना अटक केल्यानंतर त्यांना न्ययालयाने पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, वैद्यकीय उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. दीपक मानकर यांनी डायबेटीस आणि हायपर टेन्शनच्या आजारामुळे कारागृहात घरगुती जेवण मिळावे यासाठी मोका न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.