‘डिप्थेरिया’ म्हणजे काय ? जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

पोलिसनामा ऑनलाइन – डिप्थेरिया हा कॉर्नेबॅक्टेरियम या जीवाणुमुळं होणारा संसर्गजन्य जीवाणू रोग आहे. डिप्थेरिया हा सहसा 1-5 वर्षातील मुलांना होतो आणि हिव्याळ्यात याचं प्रमाण जास्त दिसून येतं. या संसर्गात घशाच्या मागच्या बाजूला एक जाड आवरण येतं ज्यामुळं खायला किंवा गिळायला त्रास होतो. जंतुमुळं साधारणपणे नाक आणि घशावर परिणाम होतो. काही वेळेस त्वचेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता असते.

काय आहेत याची लक्षणं ?

जीवाणू संसर्ग झाल्यानंतर 1 ते 7 दिवसात याची लक्षणं दिसून येतात. काही लक्षणं पुढीलप्रमाणे

– ताप येणं
– थंडी वाजणं
– सतत खोकला येणं
– लाळ गळणं
– घशात खवखवणं
– गिळायला त्रास होणं
– नाकातून पाणी गळणं
– त्वचेवर व्रण येणं

काय आहेत याची कारणं ?

– त्वचेवरील व्रण किंवा फॉमाईट्स (संसर्गित व्यक्तीच्या वापरामुळं एखाद्या वस्तूवर जीवाणू चिकटूनही संसर्ग पसरू शकतो)

काय आहेत यावरील उपचार ?

– जीवाणुंमुळं पसरलेलं विष अधिक नुकसान करू नये म्हणून डिप्थेरियाच्या उपचारांमध्ये अँटी टॉक्सिनचा वापर केला जातो.

– अँटीबायोटीक्स

इतर काळजी घेऊनही हा त्रास कमी करता येतो.

– आयव्हीतून द्रव देणं (इंट्राव्हीनस)
– आराम करणं
– श्वसन नळी वापरणं
– वायुमार्ग मोकळा करणं

डॉक्टरांना रुग्णसंसर्ग नाही याची खात्री पटेपर्यंत डिप्थेरियाच्या रुग्णांना वेगळं ठेवलं जातं.