पोलीसनामा ऑनलाइन टीम – Dipika Kakar | प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम हे 22 फेब्रुवारी 2018 रोजी लग्न बंधनात अडकले होते. आता लग्नाच्या पाच वर्षांनी हे जोडपे आई बाबा होणार असल्याची माहिती त्यांनी पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आहे. (Dipika Kakar)
सोशल मीडियावर शोएब आणि दीपिका यांचे खास फोटो दिसत आहे. ज्यामध्ये दोघांनी ‘मॉम टू बी’ आणि ‘डॅड टू बी’ असे लिहिलेली टोपी परिधान केली आहे. फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये म्हटले आहे की, “कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि अस्वस्थता या भावनांनी आम्ही तुम्हाला ही गोड बातमी सांगत आहोत. आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा आहे. लवकरच आम्ही पालक बनणार आहोत. यासाठी तुमच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची आम्हाला गरज आहे”.
सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रेटी आणि चाहते देखील कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. 2011 मध्ये दीपिकाचे रौनक मेहता सोबत लग्न झाले होते. मात्र त्यांचा संसार फार काही काळ टिकला नाही. त्यानंतर 2018 मध्ये दीपिका शोएब सोबत लग्न बंधनात अडकली. यानंतर ती बऱ्याच काळ चर्चेत देखील होती.
Web Title :- Dipika Kakar | dipika kakar announces pregnancy share photo with shoaib ibrahim
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान
Web Title :- Dipika Kakar | dipika kakar announces pregnancy share photo with shoaib ibrahim
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या एथनिक लूकने चाहते घायाळ; फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव