आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पुन्हा ‘नाचक्की’ ! ‘UNHRC’ मध्येसुद्धा समर्थन नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की होत आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) काश्मीरबाबतचा ठराव मांडण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, परंतु पाकिस्तान या प्रस्तावासाठी आवश्यक किमान पाठिंबा मिळविण्यात अपयशी ठरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर प्रस्तावासाठी बहुतेक सदस्यांनी पाकिस्तानला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला.

वास्तविक, काश्मीर प्रस्ताव सादर करण्याची आजची शेवटची तारीख होती, परंतु पाकिस्तान तसे करू शकला नाही. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी किमान १६ देशांच्या पाठिंब्याची गरज होती. जगातील विविध देशांसमोर मदतीचे आवाहन करूनही पाकिस्तान पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरला. UNHRC चे ४२ वे सत्र जिनिव्हामध्ये सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की पाकिस्तानदेखील किमान पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरला.

काय आहे नियम :
कोणत्याही देशाने आपल्या प्रस्तावावर कारवाई करण्यापूर्वी किमान समर्थन आवश्यक असल्याचे या नियमात म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी जिनिव्हाकडे जाताना इस्लामाबाद सोडण्यापूर्वी काश्मीरबाबतच्या प्रस्ताव मांडण्याचे आश्वासन दिले होते. UNHRC मध्ये इस्लामिक सहकार संघटनेचे (OIC) १५ देश आहेत. हे देश तरी पाठिंबा देतील अशी पाकिस्तानला आशा होती. काश्मीर प्रकरणावर संयुक्त निवेदन केल्यानंतरही पाकिस्तानला मते मिळू शकली नाहीत.

पाकिस्तानने यापूर्वी १० सप्टेंबर रोजी काश्मीरच्या स्थितीबाबत यूएनएचआरसीला संयुक्त निवेदन दिले होते. यात त्यांनी ६० देशांच्या पाठिंब्याबद्दल बोलले होते पण कोणत्या देशांचे समर्थन आहे हे ते सांगू शकले नाहीत. ४७ सदस्य असणाऱ्या UNHRC मध्ये पाकिस्तानकडे तीन पर्याय होते. प्रस्ताव, वादविवाद किंवा विशेष सत्र. प्रस्ताव आता या पर्यायाच्या बाहेर आहे.

विशेष सत्रे सर्वात मजबूत पर्याय असू शकतात परंतु त्यास देखील नकार दिला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २७ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या सर्वसाधारण सत्रादरम्यान विशेष अधिवेशन घेता येणार नाही. त्याचबरोबर वादाविवादासाठी किमान २४ देशांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. हे दोन्ही पर्याय फक्त तातडीची गरज असल्यास उपलब्ध आहेत.

सूत्रांनी सांगितले की, आठ आठवड्यांनंतरही काश्मीरवरील प्रकरण तातडीचे किंवा गंभीर नाही, कारण भारताने परिषद आणि सदस्यांना सांगितले की परिस्थिती नियंत्रणात आहे. त्याचबरोबर निर्बंधांना शिथिल केले जाईल असे आश्वासनही दिले आहे.

Visit – policenama.com 

 

You might also like