राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डाची स्थापना लवकरच, ७ कोटी व्यापाऱ्यांना होईल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील जवळपास ७ लाख छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार लवकरच राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्ड ची स्थापना करणार आहे. वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेच्या चालू सत्राच्या समाप्तीनंतर देखील या बोर्डाची स्थापना होऊ शकते. भाजपाने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात देखील राष्ट्रीय व्यापारी कल्याण समिती ची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते.

१ अध्यक्ष आणि १५ सदस्यांचा समावेश असणार :

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डाची सूत्रे एका अध्यक्षाच्या हातात असणार असून तो सरकारी अधिकारी असेल. याशिवाय १० सदस्य व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी असतील तर ५ सदस्य किरकोळ व्यापार क्षेत्रातील तज्ञ असतील. औद्योगिक विकास मंत्रालय तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय देखील या समितीचे सदस्य असतील. ही समिती व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवणे, कर्जाची व्यवस्था करणे, सुलभ व्यापारासाठी कायदे-नियम बनविणे इत्यादी कार्ये करणार आहे.

व्यापाऱ्यांची अनेक वर्षांपासून होती मागणी :

देशातील जवळपास ७ कोटी छोटे आणि मध्यम व्यापारी मागील अनेक वर्षांपासून व्यापारी कल्याण बोर्ड ची स्थापना करण्याची मागणी करत होते. कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे देशातील किरकोळ क्षेत्रातील व्यापारी वर्षाला जवळपास ४५ लाख कोटी रुपयांचा व्यापार करतात. परंतु देशात त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारी कोणतीही सुव्यवस्थित संस्था अस्तित्वात नाही त्यामुळे त्यांना अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांनी सरकारकडे लवकरात लवकर यासाठी योजना तयार करण्याची मागणी केली असून यामुळे या क्षेत्रात क्रांतिकारी वाढ होईल असा दावा त्यांनी केला.

आरोग्यविषयक वृत्त –