कलाटे यांच्या प्रचारात मनसेचे थेट सहभाग, निवडून आणण्याचा चंग बांधला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ मनसैनिक सर्व ताकदीनिशी प्रचारात उतरले असून कलाटे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. मंगळवारी कलाटे यांची मनसैनिकांसोबत मीटिंग झाली.

उमेदवार राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपाध्यक्ष राजू सावळे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अश्‍विनी बांगर, उपाध्यक्षा अनिता बांगर, सचिव सीमा बेलापूरकर, रुपेश पटेकर, हेमंत डांगे, मयूर चिंचवडे आदी उपस्थित होते. बैठकीत राहुल कलाटे यांच्या प्रचाराच्या रणनितीवर चर्चा झाली. चिंचवड विधानसभा मतदार संघातील महापालिकेच्या 13 प्रभागांमध्ये मनसैनिकांवर स्वतंत्रपणे प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रचारच्या अखेरच्या टप्प्यात रॅली, पदयात्रा, कोपरा सभांवर भर देण्याबाबत चर्चा झाली.

सचिन चिखले म्हणाले की, मनसे तिन्ही विधानसभा मतदार संघात ताकदीने उतरली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या शाश्‍वत व समतोल विकासासाठी तसेच प्रस्थापितांच्या मनमानी कारभाराविरोधात राहुल कलाटे यांना साथ देण्याचे आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. मनसेैनिकांवर प्रभागनिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियोजनबद्ध तसेच राहुल कलाटे यांच्या खांद्याला खांदा लावून मनसैनिक काम करीत आहेत. प्रचारात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी