‘लॉकडाऊन’मुळं बोर झालेल्या दिशा पाटनीनं इंस्टावर केलं ‘असं’ काही ! चाहते म्हणाले… (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच आपल्या बोल्ड अवतारामुळं सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसत असते. कधी दिशा तिच्या वर्कआउटच्या फोटोंमुळं किंवा व्हिडीओंमुळंही चर्चेत येताना दिसत असते तर कधी हॉट लुक किंवा बोल्ड फोटोशुट. अलीकडेच तिनं एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यात दिशा इंस्टावर टाईमपास करताना दिसत आहे. चाहत्यांनीही तिचं कौतुक केलं आहे.

दिशानं नुकताच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिशा व्हिडीओत दाखवत आहे एक डासानं कसा तिच्या चेहऱ्यावर चावा घेतला. दिशा सांगत आहे की, ती बोर झाली असून टाईमपाससाठी हे करत आहे.

https://www.instagram.com/p/B-cGdEsg7qY/

व्हिडीओ शेअर करताना दिशा म्हणाली, “जेव्हा डास बरोबर तुमच्या चेहऱ्याचा चावा घेतो.” दिशानं हा व्हिडीओ स्टोरीला शेअर केला होता.

अनेकांनी दिशाच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. एकानं म्हटलं डासाच्या चावण्यानंही दिशाचं सौंदर्य कमी झालेलं. सध्या दिशाचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. काहींनी तिला क्युट म्हटलं आहे. काहींनी तर म्हटलं आहे चेहऱ्यावरून नजर हटत नाही.

लॉकडाऊनमध्ये दिशा पाटनी गेल्या काही दिवसांपासून सतत काही ना काही चाहत्यांसोबत शेअर करत आहे ज्यामुळं ती चर्चेत येताना दिसत आहे. दिशा सोशलवर नेहमीच सक्रिय असते.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे.

https://www.instagram.com/p/Byaa121hT-e/

https://www.instagram.com/p/Bua-qFHAKcC/

https://www.instagram.com/p/B7nnkPDhJ77/

https://www.instagram.com/p/B7iVSFthg74/

https://www.instagram.com/p/BsVSs7NAaqK/

https://www.instagram.com/p/BsCjdvJA6-0/

https://www.instagram.com/p/Br0QxJLgJF5/

https://www.instagram.com/p/BvJ-eQBAxKy/

https://www.instagram.com/p/B527czzhuMQ/

https://www.instagram.com/p/B52fiFMhesh/

https://www.instagram.com/p/B4CTEGahJ45/

https://www.instagram.com/p/B3jqvyhlKRh/