डीएसकेंचे पुत्र शिरीष कुलकर्णी यांना शरण येण्याचे हायकोर्टाकडून निर्देश

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा मुक्काम सध्या येरवडा कारागृहात आहे. फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याचे देखील नाव आले असून त्याने अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणात शिरीष कुलकर्णी यांनी शरण येण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने त्यांना दिले आहेत. तसेच त्यांचा अटकपूर्व जामीन देण्यास ही नकार दिला आहे.

न्यायालयाने डीएसके यांना अनेकदा पैसे जमा करण्याची मुदतवाढ दिल्यानंतर देखील त्यांनी पैसे न जमा केल्यामुळे त्यांना दिल्लीमधून अटक करण्यात आली होती. लोकांना विविध स्किमच्या माध्यमातून जादा पैसे परतावा देण्याचे अमिष दाखवत लोकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आता या प्रकरणामध्ये त्यांचा पुत्र शिरीष कुलकर्णी यांचे देखील नाव समोर आले असून, त्याचवर देखील फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. यामुळे त्यांना हायकोर्टाकडून शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन शुक्रवारपर्यंत निर्णय कळवण्याचे आदेश देखील हायकोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, डी. एस कुलकर्णी यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांची पुतणी, जावई आणि कंपनीच्या सीईओला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने या तिघांना अटक केली होती.