‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट ‘हाल’, विकताहेत गाडीवर भाजीपाला

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक रामवृक्ष गौर यांच्यावर आज भाजी विकायची वेळ आली आहे. प्रसिद्ध कलाकारांना आपल्या इशाऱ्यावर हसवणारे आणि रडवणारे दिग्दर्शक आज आपल्या परिस्थितीशी झगडत आहे. दिग्दर्शक रामवृक्ष उत्तर प्रदेशमधील आजमगडमध्ये आपल्या घरात राहत आहेत. रील लाइफ सुंदर जगणाऱ्या दिग्दर्शकाला आपल्या परिस्थीतीशी तडजोड करुन आपल्या कुटुंबाला पोसण्यासाठी भाजी विकावी लागत आहे.

तथापि, या परिस्थितीतसुद्धा दिग्दर्शक रामवृक्ष म्हणतात की, वास्तविक जीवन आणि रील लाइफ दोन्ही चालू असते. लॉकडाऊनमध्ये मुलाची परीक्षा देण्याच्या नावाखाली आलेले रामवृक्ष आता मुंबईला जाण्यास असमर्थ आहे. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांनी त्यांना इतके घेरले आहे की, मुंबईमध्ये चित्रपटाचे काम थांबल्यामुळे त्यांना भाजीपाला विकावा लागत आहे.

एका वृत्तसंसस्थेशी खास चर्चेत रामवृक्ष आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली, या परिस्थितीतही त्यांना अशी अपेक्षा आहे की, जेव्हा सर्व परिस्थिती सामान्य होतील मग आपणही आपल्या सामान्य जीवनात परत जाऊ.

दिग्दर्शक पत्नी अनिता गौर म्हणाल्या की, परिस्थिती जर वाईट असेल तर काही गम नाही, आज नाही तर उद्या परिस्थिती सुधारेल. त्याचबरोबर त्यांची मुलगी नेहा असेही म्हणते की, जेव्हा परिस्थिती योग्य असेल तर आम्ही आमच्या शाळेत मुंबईतील आपल्या मित्रांसमवेत शिकू शकू. 25 पेक्षा जास्त टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या रामवृक्ष म्हणाले की, लॉकडाऊनमुळे त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला आहे. आता ते गाडीवर भाजी विकण्यासाठी मजबूर आहे.

त्यांनी बालिका वधू, ज्योती, कुछ तो लोग कहेंगे या मालिकेसारख्या सुपरहिट मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना फिल्मी जगात 22 वर्षांचा अनुभव आहे. आता आजमगडच्या परिसरात ही बातमी पसरली आहे की, अशा प्रसिद्ध मालिकेचा दिग्दर्शक जो आपल्या इशाऱ्यावर सगळ्या कलाकारांना हसवतो आणि रडवतो त्यांची आज परिस्थिती अशी आहे की, रिअल आयुष्य सोडून, वास्तविक जीवनात रस्त्यावर फिरून भाज्या विकत आहे.