…तर RSS ला आपला गणवेश बदलावा लागला नसता : अनुराग कश्यप

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे पुणे आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मास स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यावरून चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने टीका केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे पुण्यानंतर मुंबईतही स्वयंसेवकांकडून मास स्क्रिनिंग करण्यात आले हे टीकाकारांनी पाहावे अशा आशयाचे ट्विट एकाने केले आहे. यावर अनुराग कश्यपने पुन्हा ट्विट करत टीका केली आहे. जर हीच पीपीई किट्स पोलीस, डॉक्टर्स आणि नर्सेसना दिली असती तर संघाला गणवेश बदलण्याची गरज भासली नसती, अशी टीका अनुराग कश्यपने केली आहे.

जर तुम्हाला रिस्किंग लाईफ पाहायची असेल तर जे लोक अनवाणी रस्त्यांवर निघाले आहेत त्यांच्याकडे पाहा. प्रचाराची पण एक मर्यादा आहे, असेही त्याने नमूद केले आहे. यानंतर अनेक युझर्सनं त्याच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. काही युझर्सने सरकारवर निशाणा साधला. तर काही जणांनी अनुराग कश्यपवरही टीका केली. तुम्ही कोणत्याही चांगल्या कामाची प्रशंसा करू शकत नाही, अशी प्रतिक्रियाही एका युझरने दिली.