पोलीस महासंचालक (DGP) दत्ता पडसलगीकर उद्या होणार निवृत्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

 

राज्य पोलीस दलाचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी त्यांना मिळालेली मुदतवाढ नाकारल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान सेवा ज्येष्ठतेनुसार पडसलगीकर हे दि. ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार होते. दि. २८ ऑगस्ट रोजी त्यांना तीन महिन्यांची मुदत वाढ मिळाल्याचे समजले. मात्र सध्या सुरु असलेली कथित नक्षलींवरील कारवाई तसेच हिंदुत्ववादी कट्टरपंथीयांना नरेंद्र  दाभोलकर, गोविंद पानसरे व गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी झालेली अटक, तसेच राज्यभर सुरु असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुदतवाढ नाकरल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

[amazon_link asins=’B019MQLE20′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f41134a5-ac66-11e8-8239-c9ac104efa03′]

पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, पडसलगीकर यांनी ही मुदत वाढ नाकारली असून ते शुक्रवारी (दि.३१ ऑगस्ट) निवृत्त होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी शासकीय सलामीची जोरदार तयारी चालू असल्याचे दिसून आले आहे. पडसलगीकर यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सुबोध जयस्वाल यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे नवे पोलीस महासंचालक कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सन १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि सध्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल हे पोलीस महासंचालकपदी विराजमान झाल्यास मुंबईच्या आयुक्तपदी कोण हा प्रश्न निर्माण होणार आहे. दरम्यान, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दि. २८ ऑगस्ट रोजी सर्वप्रथम पोलीसनामा डॉट कॉमने महासंचालक पडसलगीकर यांना मुदतवाढ मिळणार कि नाही याचे वृत्त प्रकाशीत केले होते. त्याच बातमीत पडसलगीकरांनी मुदतवाढ नाकारल्यास राज्य सरकारची मोठी पंचायत होईल असे देखील नमूद करण्यात आले होते. आता राज्य सरकारपुढे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त पदावर कोणाची नेमणूक करायची हा पेच निर्माण झाला आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदी विराजमान होण्यासाठी इतर अतिवरीष्ठ पोलीस अधिकारी इच्छूक आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी परराज्यात देखील छापे टाकून काही जणांना अटक केली होती. त्यांना नैजर कैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने त्या पाच जणांच्या अटकेबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केली.  आणि त्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक पडसलगीकर यांनी मुदतवाढ नाकारल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जाहिरात