राज्यातील ८०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य पोलीस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापुर्ण सेवा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी १ मे रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी ८०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची यासाठी निवड केली जाते. यंदा अशाच ८०० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना १ मे रोजी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांची यादी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थाळावर जाहीर करण्यात आली
आहे.

राज्य पोलीस दलातील पोलीस आयुक्तालये, पोलीस अधिक्षक कार्यालये, गुन्हे अन्वेषण विभाग, बिनतारी संदेश विभाग, प्रशिक्षण व खास पथके, एसआरपीएफ, वाहतुक, महामार्ग, लोहमार्ग, आणि दहशतवाद विरोधी पथकात गुणवत्तापुर्ण काम करणाऱ्या ८०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येते.

राज्यातील अशा ८०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक कार्यालयाने जाहीर केली आहेत. ही यादी http://www.mahapolice.gov.in/OtherFlash  या संकेतस्थळावर फ्लॅश या सेक्शनमध्ये ही यादी पाहण्यास मिळेल. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनाही पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात येणार आहे.