लासलगांव ‘कृषक’ला भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संचालकांची भेट

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील भाभा अणु संशोधन केंद्रास बुधवारी BARC च्या संचालकांनी भेट दिली. या वेळी भाभा अनु संशोधन केंद्र मुंबईचे डाॅ. ए.के.मोहंती, मुख्याधिकारी वेणुगोपाल,नियंत्रक गोवर्धन, मुख्य सुरक्षा अधिकारी सी.डी. घाग यांनी भेट दिली.

lasalgaon krushak

या भेटीचा प्रमुख उद्देशासाठी भविष्यात येथील प्लांट जास्तीत जास्त प्रमाणात आंबा, डाळी, कांदा, कांदा पावडर, मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदिक चूर्ण, कलर पेंट, ड्राय भाजीपाला यावर विकिरण होत असून दरवर्षी सरासरी ४ हजार मॅट्रिक टन माळावर लासलगाव येथील कृषक मध्ये विकिरण प्रक्रिया पार पाडली जाते. या प्रकल्पाजवळ मुबलक जागा असून या दृष्टीने कसा वापरता येईल, प्लॅनच्या अवतीभोवती पडलेल्या रिकाम्या जागेत BARC कसा उपयोग करून घेईन हा भेटीचा प्रमुख उद्देश होता.

लासलगाव येथे 31 ऑक्टोंबर 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सेटेलाइट द्वारे उदघाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. कांद्याबरोबर येथे विविध फळांवर ती प्रक्रिया केली जात असून मोठ्या प्रमाणामध्ये प्रक्रिया केलेला शेतमाल निर्यात केला जातो.

या प्लॅनच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अजून काय उपाययोजना करता येईल यावर त्यांची चर्चा झाली. या वेळी कृषक ॲग्रोस चे हर्षद दोषी, प्रणव पारेख, संजय आहेर, महेंद्र अवधानी उपस्थित होते.

You might also like