COVID-19 : ‘या’ फेमस डायरेक्टरच्या अनाथ आश्रमातील 18 मुलांना ‘कोरोना’ची लागण !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : देशासह जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. रोजच कोरोनाची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशात आता एक फेसम डायरेक्टरच्या अनाथाश्रमातील 18 मुलांना कोरोनाची लागण झालं आहे. खुद्द डायरेक्टरनंच याबाबत खुलासा केला आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचा डायरेक्टर राघव लॉरेंस याच्या अनाथाश्रमातील एकूण 18 मुलांची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. राघवनं सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. राघव सामाजिक कार्यासाठी कायमच पुढे येत असतो. कोरोना विरुद्धच्या लढाईत देखील त्यानं 3 कोटींची मदत केली होती.

राघवनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “मला आशा आहे की, मी जी सेवा करतो त्यामुळं माझी मुलं लवकर यातून बाहेर पडतील.” आणखी एका पोस्टमध्ये राघवनं लिहिलं की, “एका आठवड्यापूर्वी काही मुलांना ताप आला होता.

जेव्हा त्यांनी टेस्ट केल तेव्हा लक्षात आलं की, 18 मुलं आणि 3 कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. यानंतर मी खूप निराश झालो होतो. परंतु डॉक्टरांनी मला सांगितलं की, मुलांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ते आधीपेक्षा ठिक आहेत. त्यांचा तापदेखील कमी झाला आहे. डॉक्टर म्हणाले आहेत की, त्यांची टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडलं जाईल.”