डायरेक्टरनं ट्विटरवर शेअर केला सोनाक्षी सिन्हाचा फोटो ! अभिनेत्रीनं मागितली मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांकडे मदत

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात लॉकडाऊन असल्यानं सारं काही बंद आहे. शुटींग बंद असल्यानं कलाकारही घरातच आहे. परंतु सोमवारी (दि 13 एप्रिल) अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तेव्हा चकित झाली जेव्हा डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यानं सोनाक्षी सिन्हा लॉकडाऊनमध्ये शुट करण्यासाठी ट्रोल केलं. विवेकनं ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे ज्यात सोनाक्षी शुटींग स्पॉटवर दिसत आहे. सोनाक्षी तर हे ट्विट पाहून जाम भडकली. तिनं याचा स्क्रीनशॉट काढून थेट सोशलवरून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.

https://twitter.com/sonakshisinha/status/1249619132900716549

विवेकनं जो फोटो शेअर केला तो एका न्यूज पेपरचा होता. ज्याच्या खाली कॅप्शनमध्ये लिहण्यात आलं होतं की, सोनाक्षी सिन्हा गोरेगावच्या स्टुडिओतून शुटींग करून बाहेर जाताना. फोटो शेअर करताना डायेरक्टरनं लिहिलं की, “अशा काळात कोण शुट करतं.”

https://twitter.com/sonakshisinha/status/1249604792676052992

सोनाक्षीनं विवेकच्या ट्विटच स्क्रीनशॉट ट्विट करत लिहिलं की, “मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृपया लक्ष द्या. जे लोक सध्या अफवा आणि एखाद्याबद्दल खोट्या बातम्या पसरवत आहेत त्यांना अडवण्याची प्रोसिजर काय आहे. मी एक जबाबदार नागरिक म्हणून हे विचारत आहे जी सोशल डिस्टेंसिंग प्रॅक्टीस करत आहे आणि जी शुटींग करत नाही म्हणजेच मी.

https://twitter.com/vivekagnihotri/status/1249623333236137985

सोनाक्षीनं आणखी ट्विट केलं आहे ज्यात तिनं स्पष्ट केलं आहे की, वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेला हा फोटो नोव्हेंबरमधील आहे. जेव्हा ती फराह खानच्या शोची शुटींग केल्यानंतर बाहेर पडत होती. सोनाक्षी ट्विट करत विवेकला म्हणली की, “सिनेमाशी संबंधित अनेक संस्थांचं सदस्यत्व आणि डायरेक्टर या नात्यानं तुमतच्याकडून आशा केली जाते की, तुम्हाला कमीत कमी एवढं माहिती असावं की, देशात लॉकडाऊन असल्यानं कुठेही कोणती शुटींग होत नाहीये. कारण स्टुडिओ बंद आहेत.

सोनाक्षीच्या या ट्विटनंतर विवेकनं तिला टॅग करत ट्विट केलं की, त्याची टीका तिच्यावर नसून त्या वर्तमानपत्रावर होती ज्यात आज हा फोटो प्रकाशित करण्यात आला. जर मला तुला काही म्हणायचं असलं असतं तर मी तुला टॅग केलं असतं. असंही त्यानं स्पष्ट केंलं.