The Dirty Picture फेम अभिनेत्री आर्या बॅनर्जीची हत्या नाही, तर पोस्टमार्टम मधून वेगळाच खुलासा

पोलीसनामा ऑनलाईनः ‘द डर्टी पिक्चर’ फेम 33 वर्षीय अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा (Actress Arya Banerjee) मृतदेह संशयास्पद स्थितीत तिच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी आढळून आला. पोलिस तिच्या दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा तिचा मृतदेह बेडरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. प्राथमिकदृष्ट्या आर्याची हत्या झाली, असा कयास व्यक्त केला होता. मात्र तिच्या शवविच्छेदन अहवालातून वेगळाच खुलासा समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अल्कोहोल आढळून आले. यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोलकाता पोलिसचे Joint Commissioner मुरलीधर शर्मा यांनी सांगितले की, हे हत्येचे प्रकरण नाही. आर्या लिव्हर सिरोसीसची रूग्ण होती. तिच्या पोटात जवळपास दोन लीटर अल्कोहोल आढळले. अतिप्रमाणात दारूचे सेवन केल्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला असवा. या दरम्यान तिने मदतीसाठी प्रयत्न केले असावे आणि यात ती पडली असावी. तोंडावर पडल्याने इजा झाल्याने ती रक्तबंबाळ झाली असावी. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिच्या फ्लॅटवर पोहोचले. तेव्हा आर्याचा फ्लॅट आतून बंद होता. पोलीस फ्लॅटचा दरवाजा तोडून आता गेले. तेव्हा त्यांना बेडवर आर्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. तिच्या नाकातून रक्त वाहत होते. आणि तिला उलटीही झालेली होती. अभिनेत्री आर्या बॅनर्जी खरे नाव देवदत्ता बॅनर्जी होते. ती प्रसिद्ध सितार वादक पंडित निखील बॅनर्जी यांची सर्वात लहान मुलगी होती. लव सेक्स और धोखा सिनेमातून तिने डेब्यू केला होता. तसेच ती ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमातही ती दिसली होती.