खडू अन् पेन्सिल खाणं खुपच घातक, होऊ शकते ‘या’ गोष्टीची समस्या

बर्‍याच महिलांना, मुलींना पाटी पेन्सिल खाण्याची सवय असते. ही सवय विशेषतः गर्भवती महिलांमध्ये खूप सामान्य आहे. महिलांव्यतिरिक्त मुलेही पाटी पेन्सिल खातात. जेव्हा मुले पाटीवर लिहायला शिकतात तेव्हा ते गुपचूप पाटी पेन्सिल देखील खातात. डॉक्टर असेही म्हणतात, की जे लोक अशक्त असतात त्यांना बर्‍याचदा पाटी पेन्सिल खाव्या वाटतात. जरी पाटी पेन्सिलची चव चांगली असली तरीही यामुळे शरीरावर मोठ्या प्रमाणात हानी होते आणि हे नुकसान बराच काळ टिकते. याचा अर्थ असा की जर आपण बालपणात पाटी पेन्सिल खाण्यास सुरुवात केली, तर त्याचे दुष्परिणाम तारुण्यपणात देखील उद्भवू शकते. जाणून घ्या पाटी पेन्सिल खाण्याचे काय नुकसान आहे.

बद्धकोष्ठता
पाटी पेन्सिल ही अशी गोष्ट आहे जी सहजासहजी पचत नाही. जेव्हा आपण ते खातो तेव्हा ते शरीराच्या आत जाते. म्हणूनच अनेकदा आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. आपले शरीर सहजासहजी ते पचवू शकत नाही, तेव्हा पुढील २-४ दिवस बद्धकोष्ठतेची समस्या कायम राहते आणि पाटीच्या पेन्सिली खाणाऱ्या स्त्रियांना नियमितपणे बद्धकोष्ठतेची सवय बनते.

मूत्रपिंडाची समस्या
धोकादायक जीवाणू पाटीच्या पेन्सिलमध्ये आढळतात, जे शरीराच्या आत गेल्यावर मूत्रपिंडात संक्रमण पसरते आणि परिस्थिती अधिकच बिकट होते. अन्नही पचत नाही आणि समस्या स्वतंत्रपणे वाढतात. भविष्यात मूत्रपिंडात खडे होतात कारण ही पाटी पेन्सिल शरीरात गोळा होते आणि अनेकांना असह्य त्रास देणारे खडे तयार करते.

अशक्तपणा जाणवतो
जे पाटी पेन्सिल खातात त्यांना स्वत: हून भूक कमी लागते. अशा परिस्थितीत ते हळूहळू अन्न कमी करतात. असे केल्याने त्यांच्या शरीरातील पोषकद्रव्ये कमी होऊ लागतात. जेव्हा शरीराला पोषण मिळत नाही तेव्हा ते अशक्त होऊ शकते. जर महिला आणि मुलांमध्ये अचानक अशक्तपणा येऊ लागला आणि वजन कमी झाले तर समजा की त्यांनी पाटी पेन्सिल खाण्यास सुरुवात केली आहे.

दातावर परिणाम
पाटी पेन्सिल खाल्ल्याने दातांवर वाईट परिणाम होतो. मुलांचे दुधाचे दातही बर्‍याच वेळा पाटी पेन्सिलने चघळवून मोडतात. कधीकधी दात देखील चुकीच्या मार्गाने मोडतात, जे नंतर विचित्र दिसतात. याच्या वापरामुळे जबड्यालाही नुकसान होते. रात्री झोपताना किंवा पाटी पेन्सिल खाताना बर्‍याच जणांचे जबडे दुखू लागतात. ज्याकडे ते सहज दुर्लक्ष करतात.