दहीहंडी रद्द झाल्याने लहानग्या गोविंदांचा भ्रमनिरास

थेऊर  : पोलीसनामा ऑनलाइन –    कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहीहंडीचे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने लहानग्या गोविंदाचा खुपच भ्रमनिरास झाला आहे कारण यात सर्वात आनंदाने सहभागी होणारी हीच बच्चे मंडळी असते.

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचे महत्व वेगळे त्यात सामाजिक व धार्मिक अशी दुहेरी सांगड अनुभवास येते.असाच सर्वांचा आवडता सण म्हणजे दहीहंडी हा सण गोकुळ अष्टमीच्या दुसर्या दिवशी येतो या दिवशी लहान थोर आनंद लुटतात.याची तयारी आठवडाभर अगोदर चालू होते.छोटे गोविंदा गल्लीत आपापल्या सोसायटीत वर्गणी गोळा करण्यात गर्क असतात सर्व मित्र मंडळी एकत्र येऊन नियोजन केल जात विशेष म्हणजे यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने वर्गणी देतात.आपल्या मुलांचे कौतुक बघण्यात अनेक पालक गुंग होतात.परंतु यावर्षी मार्च महिन्यापासून आजपर्यंत सर्व सामाजिक उपक्रमावर बंदी घातल्याने यावेळी दहीहंडीची फक्त आठवण काढत बसण्याची वेळ आली आहे. चार महिन्यापेक्षा अधिक काळ घरातच बसून असलेल्या बालगोपाळांची चांगलीच अडचण होत आहे.